भोजपुरी सुपरस्टार आणि गायक ‘खेसारीलाल यादव’ या दिवसांमध्ये एका पेक्षा एक गाण्यांचा वर्षाव चाहत्यांवर करत आहे. यावर्षी त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. खेसारीलालचे गाणे रिलिज झाले ते शंभर टक्के व्हायरल होणार, हे जणू समीकरणंच बनले आहे. यावर्षी येणाऱ्या होळीचा मुहूर्त साधून खेसारीने बरीच गाणी प्रदर्शित केली आहेत. आता त्याचे आणखी एक गाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीला उतरत आहे, ज्याचे बोल आहेत ‘दुई रुपया’. या गाण्यामध्ये खेसारीलालसोबत ‘अनिषा पांडे’ अभिनय करताना दिसत आहे.
नेहमीप्रमाणे या वेळी देखील खेसारीलालचे गाणे त्यांच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त व्हायरल झाले आहे .चाहत्यांना होळीच्या आधीच खेसारीलाल यांनी दिलेले हे जबरदस्त गिफ्ट आवडले आहे.
गाण्याला ‘आदिशक्ती फिल्म्स’ नी 1 फेब्रुवारी 2021 ला प्रदर्शित केले होते . ज्याला केवळ 2 आठवड्यामध्ये 2 करोडपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिले आहे. या भोजपुरी गाण्याची गीतलेखन ‘अखिलेश कश्यप’ यांनी केले आहे आणि संगीत ‘शामसुंदर’ यांनी दिले आहेत. गाण्याला ‘खेसारीलाल’ आणि ‘अंतरा सिंग’ यांनी स्वतःच्या आवाजात गायले आहे. सोशल मीडियावर या गाण्याने धमाल उडवली आहे. व्हिडिओमध्ये खेसारी आणि अंतरा हे एकमेकांसोबत ठुमके मारताना दिसत आहेत आणि या दोघांचं जबरदस्त ट्युनिंग देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
या व्यतिरिक्त ‘खेसारी लाल’ यांची होळीची आणखी दोन गाणी देखील त्याच्या चाहत्यांना खूपच आवडली आहेत.’ देवर चोली रंगे’ आणि ‘रंग बरसे भींजे चूनर चोली रंग बरसे’ हे त्यांच्या दोन गाण्याचे बोल आहेत. या दोन गाण्यांचे केवळ संगीतचं नाही तर खेसारी आणि त्यांच्या कोस्टारची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.
याव्यतिरिक्त खेसारी आपले आणखी 3 व्हिडीओ लवकरच शेअर करणार आहे. खेसारी 786, कित्ती चोखा, मन टुव के नानी ही गाणी रिलीज करणार आहे. परंतु आता त्या गाण्यांवर सध्या काम चालू आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
–डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा कशी दिसते मिथुन यांच्या सुनबाई
–एकेकाळी दीड हजारात डान्स शो करणारी आंख्या का काजल आज बनलीये कोट्यधीश
–नोरा फतेहीचा साकी साकी गाण्यावर एकदम कडक डान्स, पाहून चाहतेही झाले खुश
–धनश्री वर्माने केला आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून पती युझवेंद्र चहलची मन जिंकणारी कमेंट