Sunday, May 19, 2024

होळीच्या निमित्ताने ‘हिरो नंबर-१’ गोविंदासोबत थिरकले भोजपुरी कलाकार; व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल

आज होळीच्या निमित्ताने संपूर्ण देश आनंद साजरा करत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण होळीच्या रंगात मग्न असतात. भोजपुरी सुपरस्टार्सची होळी प्रत्येक वेळी खास असते. कोरोनाच्या वेळी देखील भोजपुरी कलाकार खूप उत्साहात दिसत आहेत. होळीचा सण जवळ येताच भोजपुरी गायकांनी त्यांची वेगवेगळी होळीची गाणी रिलीझ केली आणि भोजपुरी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.

रितेश पांडे, राकेश मिश्रा, खेसारी लाल यादव, निरहुआ, पवन सिंग, अक्षरा सिंग, अरविंद अकेला कल्लू इत्यादी भोजपुरी कलाकारांनी त्यांची होळी गाणी रिलीझ केली आहेत. पण या भोजपुरी कलाकारांची होळी खरोखर तेव्हा साजरी झाली, जेव्हा बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाही त्यांच्यात सामील झाला.

अलीकडेच भोजपुरीच्या सर्व बड्या स्टार्सनी सुपरस्टार गोविंदासोबत होळीच्या कार्यक्रमासाठी शूट केले. या कार्यक्रमात जोरदार ठुमकेही लागले. सर्व सुपरस्टार्सनी त्यांच्या आवडत्या ‘हिरो नंबर-1’ सह त्याच्या चित्रपटातील गाण्यांवर डान्स केला. टिप्स भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाची झलक पाहायला मिळाली. कार्यक्रमाचे नाव आहे ‘चढल फगुआ के रंग.’ या कार्यक्रमाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच झाले आहे.

टिप्स भोजपुरीने 27 मार्च रोजी यूट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचा एक खास व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये भोजपुरी सिनेमाचे सर्व बडे स्टार खेसारी लाल यादव, दिनेश लाल यादव निरहुआ, पवन सिंग, आम्रपाली दुबे, काजल राघवानी, अक्षरा सिंग आणि अंजना सिंग यांनी गोविंदाबरोबर, ‘मै तो रस्ते से जा रहा था’ या गाण्यावर डान्स केला. हा मजेदार व्हिडिओ अवघ्या दोन दिवसांत 13 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

‘चढल फगुआ के रंग’ या कार्यक्रमाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच झाले होते. निरहुआ, आम्रपाली दुबे, खेसारी लाल यादव, अरविंद अकेला कल्लू यांचे गोविंदासोबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोलाही प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांनी प्रियांकाच्या अंगावर चक्क पाण्याने भरलेली बादली केली होती रिकामी, निक बघतच राहिला; थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-बिग बींच्या ‘या’ गीतांशिवाय होळी सणच आहे अपूर्ण; ‘रंग बरसे’ तर आहे सर्वात हिट!

-आहा! होळीच्या दिवशी पत्नी गौरीसोबत डान्स करतानाचा शाहरुख खानचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच

हे देखील वाचा