भोजपूरी ‘जान लेबू का’ या चित्रपटाच्या गाण्याची शूटिंग सध्या लखनऊ शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी केली जात आहे. बऱ्याच काळानंतर चित्रपटामध्ये दिनेश लाल यादव आणि अक्षरा सिंग यांची जोडी दिसणार आहे. या शूटिंगचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हे व्हिडिओ चित्रपटाच्या गाण्यातील आहेत, ज्यामध्ये दिसत आहे की, गुलाबाच्या फुलांनी भरलेल्या स्टेजवर सूट-सलवारमध्ये अक्षरासह निरहुआ गाण्यासाठी रोमँटिक सीनचे शूटिंग करत आहे.
हा चित्रपटातील एक सीन आहे, ज्यामध्ये अक्षरा सिंग आपला अभिनेता दिनेश लाल यादवला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे निरहुआदेखील तिला काळजीपूर्वक ऐकताना दिसत आहे. या चित्रपटातील गाणे आणि संगीत अप्रतिम होणार असल्याचे चित्रपट दिग्दर्शक दिनकर कपूर यांनी आधीच म्हटले आहे. सध्या त्याच गाण्यांची शूटिंग सुरू आहे.
चित्रपटातील गाण्यांकडून दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ आणि अक्षरा सिंग यांना खूप आशा आहेत. निरहुआ म्हणाला आहे की, “चित्रपट खूपच रोमँटिक आहे, त्यामुळे गाणेही त्याचप्रमाणे सुरेख आणि ऐकू वाटणारे आहेत. या चित्रपटातील गाणे इतके चांगले आहेत की, माझ्या मुखात सहजरीत्या येऊ लागतात. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, जेव्हा हा चित्रपट रिलीझ होईल आणि गाणे सार्वजनिक केली जातील, तेव्हा हे खूप व्हायरल होतील.”
अक्षरा सिंगने म्हटले की, “‘जान लेबू का’ गाणे खरंच खूप चांगले आहे. जेव्हा आमच्या चित्रपटाचे गाणे येईल, तेव्हा नक्की ऐका. खूप मजा येईल. याच्या संगीतात तुम्ही हरवून जाल.” तसेच तिने पुढे म्हटले की, “खूप दिवसांनंतर मी दिनेश लाल यादव निरहुआसोबत स्क्रीन शेअर करत आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप मजाही येत आहे.”
‘जान लेबू का’ या चित्रपटाचे निर्माते श्रेय श्रीवास्तव हे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिनकर कपूर करत असून पीआरओ संजय भूषण पटियाला हे आहेत.
या चित्रपटात निरहुआ आणि अक्षरासह महिमा गुप्ता, झोया खान, मनोज टायगर, दीपक भाटिया, निलिमा पांडे, इशा जफर खान, शंकर मिश्रा आणि अरविंद वाहे मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटातील ऍक्शन प्रदीप खडगे यांचे आहे, तर कोरिओग्राफी संजय कॉर्वे आणि कला नजीर खान यांचे आहे. कॉस्ट्यूम हा बादशाहचा आहे. याव्यतिरिक्त डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी मनोज कुमार आणि डायलॉग सुधींद्र वर्मा यांचे आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
– द लेजेंड हनुमान सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
–तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
–गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात