Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी केलं वाटोळ! ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्याचं भोजपुरी व्हर्जन रिलीज

केलं वाटोळ! ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्याचं भोजपुरी व्हर्जन रिलीज

भोजपुरी लोकप्रिय गायक अरविंद अकेला कल्लू सर्वात रोमँटिक गाणं ‘तुझे देखा तो ये जाना सनम‘ घेऊन आलं आहेत. हे गाणं सोमवार (दि. 10 ऑक्टाेबर)ला सारेगामा हम भोजपुरी मधुन रिलीज करण्‍यात आलं आहे, जेव्हा लोकांनी या गाण्याचा टिझर पहिला तेव्हा त्यांना असे वाटले की, हा यशराज चोप्राचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ गाण्यासारखाच दमदार असेल. पण जेव्हा गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ सामोर आला, तेव्हा मूळ गाणं व्हर्जन गाण्यावर भारी पडलं. म्हणजे ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणं ओरिजनलच शानदार आहे.

‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्याच्या लिरिक्समध्ये छेडछाड करण्यात आली आहे, ज्यामुळे रोमँटिक गाण्याचे भोजपुरी व्हर्जन असे झाले आहे. गाण्याच्या बोल व्यतिरिक्त म्युझीक ही फारसे प्रभावी नाही. तसेच गाण्यातील स्टारकास्टचे एक्सप्रेशन शाहरुख आणि काजाेलला अजिबात टक्कर देत नाहीत.

हिंदी गाण्यात, जिथे फक्त दोन प्रेमी आपले प्रेम व्यक्त करतात, तिथे भोजपुरी व्हर्जनमध्ये अनेक बॅकग्राउंड डान्सर्स दिसतात ज्यांची या रोमँटिक गाण्यात गरज भासत नाही. त्याच वेळी, अभिनेत्री विशेष असे हाव- भाव देखील देत नाही. व्हिडिओ पाहून असे वाटते की, हे एक फ्लर्टी गाणे आहे जे मूळ गाण्याच्या तुलनेत शुन्य आहे. स्टारकास्टने काजल आणि शाहरुख बनण्याचा प्रयत्न केला असेल, पण ते पूर्ण पणे अयशस्वी ठरलं आहे.

गाण्याचे चित्रीकरण केले सौम्या त्रिपाठीवर
लोकेशनबद्दल बोलायचे झाले, तर जुने गाणे शेतात शूट केले गेले होते, ज्यामध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि खरे प्रेम स्पष्टपणे दिसत होते, परंतु नवीन व्हर्जनमध्ये बॅकग्राउंड देखील हास्यपद प्रकारे बनवण्यात आले आहे. नवीन अभिनेत्री सौम्या त्रिपाठीवर चित्रीकरण करताना हे गाणे कल्लू आणि शिल्पी राजने गायले आहे. गाण्याचे बोल आशुतोष तिवारी यांनी लिहिले असून संगीत प्रियांशू सिंग यांचे आहे, तर कोरिओग्राफर लकी विश्वकर्मा आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खास किस्सा: अफगाणिस्तानात ‘खुदा गवाह’च्या शुटिंगवेळी अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी अर्धी एयरफोर्स होती
न ऐकलेला किस्सा : ….म्हणून अमिताभ बच्चन यांनी डावा हात खिशात टाकून केली होती ‘शराबी’ चित्रपटाची शूटिंग

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा