Thursday, April 18, 2024

प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या ‘हॅलो कौन’ गाण्याने मोडले सर्व रेकॉर्ड्स; कोट्यवधी व्ह्यूजसह साँग ठरले सुपरहिट

आजकाल भोजपुरी गाणी देशभरात प्रचंड प्रसिद्ध होत आहेत. हे फक्त बिहार, यूपी आणि झारखंडपुरते मर्यादित नाही, तर इतर राज्यांतील लोकही ही गाणी गाताना दिसतात. भोजपुरी सुपरस्टार रितेश पांडे जेव्हाही नवीन गाणे घेऊन येतो, तेव्हा ते काही काळातच भन्नाट व्हायरल होतात. रितेश पांडेच्या नवीनच नाही, तर जुन्या गाण्यांचा प्रवासदेखील अजूनही अबाधित आहे. अशातच आता त्याच्या एका गाण्याने सर्व गाण्यांचे रेकॉर्ड तोडले आहे.

रितेश पांडेचे ‘हॅलो कौन’ हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. हे प्रसिद्ध रॅप गाणे त्याच्या मजेदार लिरिक्समुळे व्हायरल झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होऊन दीड वर्षाहून अधिक काळ झाला आहे, पण तरीही हे गाणे अव्वल यादीत आहे. या गाण्याला ८०० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या या गाण्याने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

‘हॅलो कौन’ हे गाणे स्वतः रितेश पांडे आणि अभिनेत्री स्नेहा उपाध्याय यांनी गायले आहे. त्याचे बोल आणि संगीत आशिष वर्मा यांनी दिले आहे. हे गाणे रितेश पांडे आणि अभिनेत्री स्नेहा उपाध्यायवर चित्रीत केले गेले आहे. या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना दोघांची केमिस्ट्री खूप आवडत आहे.

आतापर्यंत या गाण्याला सुमारे ३ लाख लाईक्स मिळाले आहेत. असे मानले जाते की, हे गाणे हिट होण्याचे सर्वात मोठे कारण लॉकडाऊन होते. लॉकडाऊन दरम्यान प्रेक्षकांना ते खूप आवडले. हे गाणे ऐकायला इतके मजेदार आहे की, ते स्वतःचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे. रितेश पांडेचे ‘हॅलो कौन’ हे गाणे १० डिसेंबर, २०१९ रोजी प्रदर्शित झाले होते.

अलीकडेच, रितेशचे ‘लवंडिया लंदन से लाएँगे’ हे गाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झाले होते. परंतु आजही या गाण्याला चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. त्याचबरोबर ‘मेहरारू दल बात नहीं’, ‘आज जेल हो कल बेल होई’ सारखी अनेक व्हिडिओ गाणी लाखो व्ह्यूजच्या क्लबमध्ये सामील झाली आहेत. ही सर्व गाणी यूट्यूबवर खूप धुमाकूळ करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ

-‘आम्ही दोघांनी अजूनही लग्न नाही केले’, म्हणत सलमान खानने केला आयुष्यातील खऱ्या प्रेमाचा खुलासा

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

हे देखील वाचा