रुबीना दिलैकने केली बोल्डनेसची हद्द पार; मोनोकनीमध्ये दिसतेय एकदम हॉट; व्हिडिओ भन्नाट व्हायरल


टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस 14’ ची विजेती स्पर्धक आणि अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. बिग बॉसच्या घरात तिचा हटके अंदाज, टास्क खेळण्याची पद्धत आणि लोकप्रियता त्यामुळे तिने हा शो जिंकला आहे. आधीपासून मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या रुबीनाला बिग बॉसमध्ये खूप पसंती मिळाली. तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला होता. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती अभिनव शुक्ला देखील होता. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम सर्वांनी पाहिले आहे. या शोनंतर रुबीना खूप चर्चेत आली होती. तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन फोटो पोस्ट करत असते. अशातच रुबीनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

रुबीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने बोल्डनेसची हद्द पार केली आहे. तुम्ही पाहू शकता की, रुबीनाने पिवळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. सुरुवातीला ती स्विमिंग पूलमध्ये उभी असते, नंतर ती स्विमिंग पूलमध्ये पोझ देताना दिसत आहे. यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की, ती स्विमिंग पूलमधील बोल्ड फोटोशूट करत आहे. (Bigg Boss 14 fame Rubina dilaik’s yello monokini video viral on social media)

रुबीनाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर फायर आणि हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ३ तासांच्या आतच २ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. या आधी देखील रुबीनाचे अनेक बिकिनी फोटो व्हायरल झाले आहेत.

रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावां’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानिया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बोल्ड एँड ब्युटीफुल! बीचवरील रेतीने माखलेली दिसली दिशा पटानी; बिकिनीतील बोल्ड फोटोचा इंटरनेटवर बोलबाला

बापरे बाप! ‘लूई विटॉन’ ब्रँडच्या महागड्या ड्रेसमध्ये दिसली सोनम कपूर; किंमत वाचून होतील बत्त्या गुल

-ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’


Leave A Reply

Your email address will not be published.