छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे बिग बॉस 16 मध्ये यावेळी प्रेक्षकांना अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार वाद घालण्यापासून ते नवीन टास्कपर्यंत लोकांचे जोरदार मनोरंजन केले जात आहे. दरम्यान, हा शो आता असे काही करणार आहे, जे आतापर्यंत झाले नव्हते. आगामी एपिसोडमध्ये बिग बॉस स्वतः घरामध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिग बॉसचा आवाज असणारे विजय विक्रम सिंग घरामध्ये दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, विजय विक्रम सिंग (vijay vikram singh) राष्ट्रीय टेलिव्हिजनवर सुंबूलच्या वडिलांनी तिच्यासाठी लिहिलेले पत्र वाचताना दिसत आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोनुसार, घरातील सदस्यांना घरात येणाऱ्या पाहुण्यांकडे दुर्लक्ष करावे लागेल. व्हिडिओमध्ये शालीन भानोटसमोर एक व्यक्ती चिकन खाताना दिसत आहे, तर दुसरा पाहुणा इतर स्पर्धकांना चिडवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, विजय विक्रम सिंह सुंबुलसाठी पत्र वाचताना दिसत आहे.
बिग बाॅसने स्पर्धकाला दिले नवीन टास्क
हे टास्क आठवड्याच्या रेशनसाठी ठेवण्यात आले आहे. टास्कच्या नियमांनुसार, घरातील सदस्यांनी बाहेरील लोकांच्या एक्टिविटीवर प्रतिक्रिया देऊ नये किंवा प्रभावित होऊ नये. नियमानुसार या टास्कमध्ये तीन जण भावनिक झाले तर त्यांना एक टोकरी गमवावी लागेल.
Rashan ke liye papa ke letter ko nazar andaz or apne emotions ko control kr payengi #sumbul#BiggBoss16 #biggboss #AbduRozik #MCStan #ShivThakare #AnkitGupta #NimritKaurAhluwalia #SalmanKhan #archnagautam #TinaDatta #SumbulTouqeerKhan #PriyankaChaharChoudhary pic.twitter.com/Oc5mJE7119
— Zamzam pasha (@zamzampasha) December 21, 2022
अभिनेता सोबतच व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे विजय विक्रम सिंग
विजय विक्रम सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो एक अभिनेता सोबतच व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. आत्तापर्यंत तो अनेक वेब सीरिजमध्ये दिसला आहे. बिग बॉस या शोचे वर्णन करण्याव्यतिरिक्त, तो ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिजच्या दोन्ही भागांमध्येही दिसला आहे. (bigg boss 16 vijay vikram singh enters in bb house read letter for imlie fame actress sumbul touqeer khan)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
देवोलीनाने सांगितले थाटामाटात लग्न न करण्याचे कारण; म्हणाली, ‘लोक मला गोल्ड डिगर…’
बर्फी वाटा रे! ‘हा’ अभिनेता बनला बापमाणूस, सागरिका अन् नीलम कोठारीनेही दिल्या प्रेमळ शुभेच्छा