लग्नानंतर सत्यनारायण पूजेला बसलं वैद्य जोडपं; पाहायला मिळाला पारंपारिक लूक


चंदेरी दुनियेत यावर्षी अनेक रेशीमगाठी बांधल्या गेल्या आहेत. पण या सगळ्यात एक लग्न मात्र जोरदार चर्चेत आहे, ते म्हणजे बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचे. त्यांच्या प्रेमापासून ते लग्नापर्यंत सगळे प्रेक्षक साक्षीदार आहेत. राहुलने बिग बॉसमध्ये असताना सगळ्यांच्या साक्षीने टेलिव्हिजनवर‌ दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. तसेच सर्वांच्या साक्षीने त्यांनी सप्तपदी घेतली आहे. राहुल आणि दिशाने १६ जुलै, २०२१ रोजी लग्न केले आहे.

राहुल आणि दिशाच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच लग्नाच्या आधी झालेल्या सगळ्या फंक्शनची झलक देखील त्यांनी प्रेक्षकांना दिली होती. (Bigg boss fame Rahul vaidya and disha Parmar MaharashtrIan pooja after marriage at his home)

आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेनुसार सुखी, आनंदी वैवाहिक जीवनाची सुरुवात सत्यनारायणाच्या महापुजेने केली जाते. राहुल आणि दिशाने देखील सत्यनारायणाची पूजा करून त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. या पूजेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहुल आणि दिशा पारंपारिक पोषाखात दिसत आहे.

दिशाने गुलाबी रंगाची काठाची साडी परिधान केली आहे. तिने नाकात नथ, गळ्यात एक छोटासा नेकलेस आणि मंगळसूत्र घातलं आहे. तसेच कपाळावर‌ कुंकू लावलं आहे. केसांचा अंबाडा घातला आहे. तसेच हातावर असलेल्या मेहंदीने आणि चुड्याने नव्या नवरीचे रूप आणखीनच खुलले आहे, तर दुसरीकडे राहुलने पांढरा कुर्ता घातला आहे. एकंदरीत ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. त्यांच्या बाजूला सत्यनारायणाची पूजा मांडलेली दिसत आहे. तसेच पूजेचे सर्व साहित्य दिसत आहे.

दिशाने तिच्या लग्नात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तसेच रिसेप्शनला ती वेस्टर्न लूकमध्ये दिसत होती. वेस्टर्न लूकमध्ये ती जेवढी बोल्ड दिसते, तेवढीच साधी आणि सालस ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


Leave A Reply

Your email address will not be published.