Friday, September 20, 2024
Home मराठी कोण आहे शिव ठाकरेची मिस्ट्री गर्ल ? नेटकरी करत आहेत चर्चा

कोण आहे शिव ठाकरेची मिस्ट्री गर्ल ? नेटकरी करत आहेत चर्चा

बिग बॉस मराठी 2 चा विजेता, अमरावतीचा शिव ठाकरे (Shiv Thakare) प्रेक्षकांचा आवडता आहे. आपल्या साधेपणाने तो नेहमी प्रेक्षकांचं मन जिंकतो. बिग बॉस मध्ये असताना वीणा जगतापसोबत त्याचे अफेअर चर्चेत होते. नंतर डेझी शाहसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. आता नुकताच शिवने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यात त्याने मुद्दाम मुलीचा चेहरा लपवला आहे.

शिव ठाकरेने सोशल मीडियावर नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एका फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने मिस्ट्री गर्लला आपल्या मिठीत घेतले आहे. तिच्या कपाळावर तो किस करताना दिसत आहे. फोटोत मिस्ट्री गर्लचा चेहरा लपवत त्याने हार्ट इमोजी लावला आहे. यामुळे ती मुलगी नक्की कोण आहे हे कळत नाही.

शिवने शेअर केलेल्या या फोटोनंतर चाहत्यांनीही अंदाज लावायला सुरुवात केली आहे. शिव कोणाच्या प्रेमात आहे की हा त्याचा पब्लिसिटी स्टंट आहे हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान सोशल मीडियावर शिवच्या चाहत्यावगनि मिस्ट्री गर्लचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘तंगड्या वर करून कॅमेऱ्यासमोर झोपते…’ बिग बॉसच्या घरातला वाद अजून पेटला, प्रसिद्ध अभिनेत्रीची तीव्र प्रतिक्रिया
आमिरने साजरं केलं मुलाचं यश ! ‘महाराज’च्या सक्सेस पार्टीचे फोटोज व्हायरल

हे देखील वाचा