टेलिव्हिजनवरील विवादित शो म्हणून बिग बॉस शो ओळखला जातो. मात्र यावेळेस या शोमध्ये जरा बदल करत बिग बॉस ओटीटी हे नवीन व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. बिग बॉस ओटीटी सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. या एका आठवड्यातच बिग बॉसला हिट करण्यासाठी वेगवेगळ्या ट्विस्टचा वापर सुरु झाला आहे.
ओटीटीवर सुरु असणारा हा शो सध्या करण जोहर होस्ट करत आहे. सडे चार पाच आठ्वड्यानी बिग बॉस टीव्हीवर दाखवले जाणार आहे, आणि तेव्हा पुन्हा सलमान खानच होस्ट असणार आहे. मात्र आता एका मोठ्या वेबपोर्टलच्या बातमीनुसार या शोचे मेकर्स बिग बॉसमध्ये एव्हरग्रीन आणि जेष्ठ अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री करणार असल्याचे सांगितले आहे. ही बातमी जर खरी असेल तर रेखा यांच्या प्रवेशामुळे संपूर्ण गेम पलटू शकतो.

सध्या रेखा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका असणाऱ्या ‘गुम है किसी के प्यार मैं’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसल्या. रेखा असणारे मालिकेचे आतापर्यंत दोन प्रोमो प्रदर्शित झाले आहे. रेखा यांच्या प्रोमोंमुळे मालिकेच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे आता रेखा यांना बिग बॉससोबत जोडल्यावर बिग बॉसच्या लोकप्रियतेत देखील नक्कीच वाढ होऊ शकते. एका बातमी नुसार रेखा या बिग बॉस ओटीटीच्या नवीन फिचरमध्ये त्या ‘ट्री ऑफ फॉर्च्यून’ला त्यांच्या आवाज देताना दिसतील.
रिपोर्टनुसार रेखा यांनी त्यांचा व्हॉइसओव्हर रेकॉर्डसुद्धा केला असून, लवकरच तो ऑन एयर केला जाणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ची ह्यावेळेस ‘स्टे कनेक्टेड’ थीम असून या नुसार स्पर्धकांना पाच आठवडे त्यांचे कनेक्शन टिकवून ठेवावे लागणार आहे. ज्यांचे कनेक्शन नसेल आणि ज्यांना कमी मतं पडतील त्यांना शोमधून बाहेर काढण्यात येणार आहे. पहिल्याच आठवड्यात या शोमधून उर्फी जावेद बाहेर पडली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-