Thursday, April 25, 2024

यामुळे ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंगने मारली होती सहकलाकाराच्या कानफटीत; वाचा तिचा ‘संध्या बिंदनी’पर्यंतचा प्रवास

या ग्लॅमर जगात मेहनत, चिकाटीसोबतच लक हा फॅक्टर खूपच महत्वाचा ठरतो. चित्रपट आणि मालिका या दोन्ही क्षेत्रात नेहमीच चित्रपटांना अग्रणी स्थान दिले जाते. मात्र प्रत्येक कलाकारांचे चित्रपट हे सतत प्रदर्शित होत नाहीत. पण मालिकांचे तसे नाहीये. मालिका २-३ वर्ष चालत असल्याने ती मालिका आणि मालिकेतील कलाकार आपल्याला आपल्या घरचेच वाटतात. कधी कधी तर चित्रपटांपेक्षा अधिक लोकप्रियता मालिकेतील कलाकरांना मिळते. या कलाकारांची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ मालिका संपल्यावरही तशीच राहते. अशीच एक टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे, सर्वांचीच आवडीची ‘संध्या बिंदनी’ उर्फ दीपिका सिंग. आज दीपिका तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक महिती. (birthday special deepika singh diya aur bati fem deepika singh)

दीपिकाचा जन्म २६ जुलै १९८४ ला दिल्लीमध्ये झाला. दीपिकाला लहानपणापासूनच अभिनयात करिअर करायचे होते. त्यामुळे ती नेहमी थियेटरमध्ये सक्रिय राहिली. तिने बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशनमधून पदव्यूत्तर पदवी संपादन केली. अभिनयात करिअर करण्यासाठी दीपिकाला खूप मेहनत करावी लागली. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि तिला २०११ साली स्टार प्लसची ‘दिया और बाती’ ही मालिका मिळाली. दीपिकाने तिच्या पहिल्याच मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील तिची संध्या राठी ही भूमिका खूपच गाजली आणि तिला घराघरात ओळख मिळाली.

‘दिया और बाती’ या मालिकेची शूटिंग सुरु असताना, मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या दीपिका आणि सूरज अनस यांच्यामध्ये वाद असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. एका रिपोर्टनुसार शूटिंगदरम्यान अनसने दीपिकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि त्यानंतर त्याने तिला चुकीचा शब्द वापरला. हे तिला सहन न झाल्याने तिने त्याला जोरात कानफटीत मारली होती. दीपिकाने पाच वर्ष या शोमध्ये काम केले त्यानंतर २०१६ साली हा शो बंद झाला. यांनतर ती ‘कवच’ मालिकेत देखील दिसली.

दीपिका सिंगने २०१४ साली ‘दिया और बाती’चे दिग्दर्शक असणाऱ्या रोहित राज गोयलसोबत लग्न केले. त्यानंतर रोहितने हा शो सोडला. दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत फॅन्सच्या संपर्कात असते. २०१७ साली दीपिकाने मुलाला जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर दीपिकाने अभिनयातून ब्रेक घेतला. दीपिकाच्या आईला कोरोना झाल्यानंतर दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्ली सरकारकडे मदत देखील मागितली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना

हे देखील वाचा