स्वत:च्या मुलीबरोबर लिप लॉक करतानाचा फोटो प्रसिद्ध झाल्यावर महेश भट म्हणाले होते, पुजा माझी मुलगी नसती तर…


बॉलिवूड कलाकार जेवढे त्यांच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, तेवढेच किंबहुना जास्त त्यांच्या खासगी आयुष्यासाठी ओळखले जातात. या क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे वैयक्तिक आयुष्य चित्रपटांइतकेच गाजले. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट. पूजाने ९० च्या दशकात अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. महेश भट्ट यांची मुलगी असणारी पूजा एक उत्कृष्ट अभिनेत्रींसोबतच यशस्वी दिग्दर्शिका देखील आहे. आज पूजा तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. २४ फेब्रुवारी १९७२ ला मुंबईमध्ये पूजाचा जन्म झाला.

पूजाने वयाच्या १७ व्या वर्षीच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. तिने अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले. अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या पूजाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली. पूजाला चित्रपटांसोबत जास्त प्रसिद्धी मिळाली ती तिच्या खासगी आयुष्यामुळे. तिची रियल लाइफ एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा काही वेगळी नव्हती. अनेक कारणांमुळे पूजा नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. असे असले तरी तिने तिच्या जीवनात आलेल्या अनेक चढ उतारांना धीराने तोंड दिले. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया पूजाच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी.

पूजाने तिच्या अभिनयाची सुरुवात १७ व्या वर्षी ‘डॅडी’ या सिनेमातून केलो. त्यानंतर तिने आमिर खानबरोबर ‘दिल हैं के मानता नही’ हा सुपरहिट सिनेमा दिला. पूजाने तिच्या करियरमध्ये सडक, चाहत, तमन्ना, बॉर्डर, जख्म, जुनून, अंगारे आदी हिट सिनेमांमध्ये काम केले. शिवाय पूजाने २००३ साली आलेल्या ‘पाप’ सिनेमात दिग्दर्शनात देखील पाऊल टाकले.

आज महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांचे नाते अतिशय मजबूत पहायाला मिळते. अनेक कार्यक्रमांना पूजा आणि महेश भट्ट सोबतच हजेरी लावताना दिसतात. मात्र असे असले तरी एक काळ असा होता जेव्हा या बाप लेकीच्या नात्यात अतिशय कटुता आणि अंतर निर्माण झाले होते. याला कारण होते, महेश भट्ट यांचे दुसरे लग्न.

महेश भट्ट यांनी अनाथ असलेल्या किरण यांच्याशी पहिले लग्न केले. या लग्नातून त्यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले झाली, पण काही वर्षांनी महेश यांच्या आयुष्यामध्ये सोनी राजदान यांची एन्ट्री झाली आणि किरण, महेश यांचे संबंध खराब होण्यास सुरुवात झाली. यातूनच या दोघांनी घटस्फोट घेतला. पुढे महेश यांनी सोनी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. सोनी राजदान यांच्यामुळेच आपले आई, वडील वेगळे झाले, हा राग पूजा यांच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे पूजा यांनी त्यांच्या वडिलांशी बोलणे बंद केले. अनेक वर्ष त्या त्यांच्या वडिलांशी बोलल्या नाही. मात्र काही वर्षांनी त्यांच्यातील नाते पुन्हा पूर्वीसारखे झाले.

याच दरम्यान एका मासिकाच्या मुखपृष्ठावर महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांचा एक धक्कादायक फोटो छापून आला. महेश आणि पूजा यांचा एकमेकांना लिप लॉक करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता. हा फोटो प्रसिद्ध झाल्या झाल्या प्रचंड मोठे वादळ उठले. बाप मुलीचा असा लिपलॉक करतानाचा फोटो पाहून सगळीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. वाद वाढत असल्याचे समजताच महेश भट यांनी एक पत्रकार परिषद बोलवली. परंतु या पत्रकार परिषदेत त्यांनी असे काही विधान केले ज्यामुळे पुन्हा वाद सुरु झाला. “पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते”, असे ते यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वाक्याने वाद आणखीच चिघळला. काही कारण सांगून त्यांनी हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आजही महेश भट त्यांच्या या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत

पूजा भट्ट ही काही वर्षांपूर्वी दारूच्या अधीन होती. ती दारूमध्ये इतकी गुंतली होती की, तिने एकदा सांगितले होते जगातली अशी कोणतीही दारू नाही जिची तिने चव घेतली नाही. २०१६ पर्यंत पूजा दारूमध्ये आकंठ बुडालेली असायची. मात्र २०१६ पूजाने दारूला कायमचा अलविदा म्हटला. दारू सोडण्याचा हा स्वत:शीच सुरू असलेल्या संघर्षाविषयी पूजाने सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त करत लोकांना आवाहन केले होते.
तिने लिहिले होते की, ” २ वर्ष १० महिने मी दारूशिवाय आहे. काही गोष्टींची जाणीव झाल्याने मी या वाईट सवयीपासून सुटका मिळवली आहे. तुमच्यापैकी जे कोणी या वाईट सवयीचा शिकार झाले असाल तर तुम्ही देखील ठरवले आणि संयम बाळगला तर यातून मुक्ती मिळवू शकता.”

पूजा फक्त वाद विवादांमुळेच नाही तर पूजाने तिच्या बोल्ड अवताराने आणि तिच्या व्यक्तव्यांमुळे देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती तेव्हा, पूजाने महात्मा गांधींचे एक वाक्य ट्विट केले होते. तिने लिहिले होते की, ” माझे अशा सरकारवर बिलकुल प्रेम नाही आणि सन्मान देखील नाही, जे अनैतिकता वाचवण्यासाठी चुकीचे काम करत आहे.”

खूप कमी लोकांना माहित असेल की पूजा भट्टचे लग्न देखील झाले होते. २००३ साली तिने मनीष माखिजासोबत लग्न करत सर्वानाच धक्का दिला होता. मनीष एक टीव्ही कार्यक्रमाचा सूत्रधार होता. मनीष आणि पूजेची पहिली भेट ‘पाप’ सिनेमाच्या सेटवर झाली. यादरम्यानच ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले, मात्र हे लग्न जास्त काळ टिकले नाही. काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला.


Leave A Reply

Your email address will not be published.