Friday, March 29, 2024

‘शूटआऊट ॲट वडाला’मधील इंटिमेट सीनवेळी बेभान झाला जॉन, तर कंगनाला केले होते रक्तबंबाळ

अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याने बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे. मॉडेलिंगनंतर त्याने एका मीडिया फर्ममध्ये काम केले आणि तो म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला. जॉनच्या करिअरची सुरुवात ‘जिस्म’ आणि ‘साया’ यांसारख्या चित्रपटांनी झाली. ‘जिस्म’ एक एरॉटिक थ्रिलर होता. या चित्रपटानंतर तो आणि बिपाशा बॉलिवूडचे सेक्स सिम्बॉल मानले गेले. जॉनने अनेक चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत. ‘शूटआऊट ॲट वडाला’ या चित्रपटातील एका गाण्यात जॉन इतका आक्रमक झाला होता की, त्याची सहकलाकार कंगना रक्तबंबाळ झाली होती. जॉनने शनिवारी (१७ डिसेंबर)  त्याचा ४९वा वाढदिवस साजरा केला आहे. आज या लेखात जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…

गाण्यात होते ॲग्रेशन आणि प्रेम
देसी बॉय जॉन हा बॉलिवूडचा हँडसम हंक आहे. मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. जॉन लव्ह मेकिंग सीन्ससोबत ऍक्शन सीन देण्यातही माहीर आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये हेवी बाइक्स उचलल्या आहेत. त्याचवेळी ‘शूटआउट ॲट वडाला’च्या एका सीनमध्ये जॉन कॅरेक्टरमध्ये इतका हरवला होता की, त्याच्यामुळे कंगनाला (Kangana Ranaut) नकळत दुखापत झाली आणि रक्त आले. दोघांचे ॲग्रेशन आणि प्रेम गाण्यात दाखवण्यात आले होते. (birthday special when john abraham hurted kangana ranaut in yeh junoon song sex scene of shootout at wadala)

किसिंग सीन करायला नव्हती आली अडचण
माध्यमांतील वृत्तानुसार, एका सीनमध्ये फक्त किसिंग सीन होता. हा खूप हिंसक प्रकार होता पण जॉन आणि कंगनाने त्यांच्या आधीच्या चित्रपटात किसिंग सीन केला होता, तेव्हा असा सीन व्यवस्थित झाला होता.

लव्ह मेकिंग सीनमध्ये झाली होती दुखापत
दुसरा लव्ह मेकिंग सीन बेडवर होता. यामध्ये जॉनने कंगनाचा हात पकडला. या गाण्यात कंगनाने बांगड्या घातल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जॉन लव्ह मेकिंग सीनमध्ये इतका हरवला की, कंगनाची बांगडी तुटली आणि तिच्या हातात टोचून रक्त बाहेर आले होते.

जॉनने मागितली माफी
हे घडताच जॉन चांगलाच अस्वस्थ झाला आणि त्याने लगेचच कंगनाची माफी मागितली. तिथे उपस्थित लोकांना हे देखील समजले की, दोघेही इतके चांगले कलाकार आहेत की, सीनमध्ये बुडाल्यामुळे हे घडले. कंगनानेही या गोष्टीचे वाईट वाटून न घेता बाकीचे शूट चांगले केले.

‘शूटआउट ॲट वडाला’मध्ये जॉन अब्राहम, कंगना रणौत, मनोज बाजपेयी, सोनू सूद, तुषार कपूर आणि अनिल कपूर देखील होते. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा