Thursday, November 30, 2023

आलिशान घरापासून ते जिमपर्यंत आदी अनेक आलिशान वस्तूंचा मालक आहे जॉन अब्राहम

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा जॉन अब्राहम आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. तो सध्या त्याच्या ‘सत्यमेव जयते 2′ चित्रपटासाठी चर्चेत आहे. जॉन आऊटसाईडर असूनही त्याने बॉलिवूडमध्ये मेहनतीने आपला ठसा उमटवला. क्वचितच असे घडते जेव्हा निर्माता किंवा दिग्दर्शकाने जॉनवर पैसे लावले आणि त्याने त्यांना निराश केले. जॉन प्रत्येक चित्रपटात त्याची 100% कामगिरी देतो. त्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो मनापासून काम करतो. तितक्याच खुल्या मनाने आयुष्यही जगतो. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याची आलिशान लाईफस्टाईल. त्याच्या लक्झरी लाईफस्टाइलमध्ये समाविष्ट असलेल्या त्याच्या आलिशान वस्तूंबद्दल जाणून घेऊया.

आलिशान घर
जॉनकडे एक नाही, तर दोन आलिशान घरे आहेत. जॉनने मुंबईत समुद्राजवळ एक सुंदर घर बांधले आहे. त्याचं अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्येही घर आहे. जॉनच्या घराजवळ बड्या हॉलिवूड कलाकारांची आलिशान घरेही आहेत.

लक्झरी गाड्या

जॉनला गाड्या कलेक्ट करण्याची खूप आवड आहे. त्याच्याकडे जगभरातील आलिशान गाड्या आहेत. ज्यामध्ये लैम्बोर्गिनी गैलार्डो, निसान जीटी-आर, ऑडी क्यू 3 सारख्या कारचा समावेश आहे. या गाड्यांची किंमत लाखांपासून सुरू होते आणि कोटींमध्ये संपते.

बाइक आवडते

जॉन चित्रपटांमध्ये महागड्या बाइक चालवताना दिसला आहे. पण खऱ्या आयुष्यातही त्याला बाइक कलेक्शनची खूप आवड आहे. त्याच्याकडे यामाहा आर 1, कावासाकी निंजा आणि सुजुकी हायाबुसा सारख्या महागड्या बाइक्सचे कलेक्शन आहे.

जिम ओनर

चित्रपटांव्यतिरिक्त जॉन जिमचाही ओनर आहे. जॉन अब्राहम वरळी आणि पुण्यात जेए फिटनेस नावाच्या दोन जिम चालवत आहेत. जॉन हा फिटनेस फ्रीक अभिनेता असल्याने त्याने आपल्या जिममध्ये महागडी इक्विपमेंट्स ठेवली आहेत.

जॉन अब्राहम एका चित्रपटासाठी सुमारे 5 ते 7 कोटी रुपये घेतो आणि त्याची एकूण मालमत्ता सुमारे 251 कोटी रुपये आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जॉन अब्राहमने रेस्टॉरंटमध्ये तब्बल 64 चपाती खाल्ल्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या वेटरची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

जेव्हा जॉन अब्राहमला तालिबानकडून आली होती धमकी, १६ वर्षांनी केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा