Saturday, September 30, 2023

काय सांगता! अभिनेत्री समांथा रुथ प्रभू करणार राजकारणात प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण

राजकारण आणि कलाकार यांचे अगदी जवळचे नाते आहे. अनेक कलाकार मंडळींनी राजकारणात प्रवेश केले आहे. सध्या साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलेले जात आहे. ती नेहमीच तिच्या प्रत्येक चित्रपटामुळे चर्चेत असते.ती नुकतीच विजय देवरकोंडासोबत ‘कुशी’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विषेश स्थान निर्माण केले आहे. आता ती राजकारणाच्या दुनियेत पाऊल ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

सामंथा आणि विजय देवरकोंडा या जोडीचा खुशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अभिनेत्री नेहमीच तेलंगणा भागातील शेतकऱ्यांची खंबीर समर्थक करताना दिसते. इतकंच नाही तर ती तेलंगणाच्या हातमागाच्या कपड्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. समांथा (Actress Samantha Politics) के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये ती सामील होऊ शकते. पण या वृत्तावर आद्याही कोणत्याही प्रकारचा दुजोरा अभिनेत्रीने दिलेला नाही.

‘फॅमिली मॅन’ अभिनेत्री मायोसिटिसचे निदान झाल्यानंतर सध्या तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. तिच्या मॅनेजरने तिची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बातमी समोर आल्याने ती नुकतीच चर्चेत आली आहे.

सामंथाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सामंथा राज आणि डीकेच्या ‘सिटाडेल इंडिया’मध्ये आता वरुण धवनसोबत दिसणार आहे. अभिनेत्रीने नुकतीच इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘कुशी’ या चित्रपटाबद्दल सांगितले आहे. त्याला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल तिने आनंद व्यक्त केला. प्रेक्षक तिच्या एंट्री सीनवर नोटांचे बंडल फेकतानाचा व्हिडिओ शेअर करत समांथाने लिहिले, ‘तुम्ही मला सर्वात भाग्यवान मुलगी समजता.’ (Actress Samantha Ruth Prabhu will enter politics)

अधिक वाचा-
‘जवान’च्या वादळात उडून गेला ‘गदर 2’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई
विदुला चौगुलेच्या दिलखेच अदा; शेअर केले खास फोटो

हे देखील वाचा