बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या तिच्या कामात व्यस्त आहे. कॅटरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. अशात कॅटरिना न्यूयॉर्कला सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती, जिथून ती शुक्रवारी (7 जुलै)ला मुंबईला परतली. यादरम्यान तिचे विमानतळावरील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. कारण, विमानतळावर असंच काहीसं घडलं, ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे.
खरे तर, विमानतळावरील व्हायरल व्हिडिओमध्ये कॅटरिना कॅज्युअल आउटफिट्समध्ये खुपच सुंदर दिसत आहे. अशात विमानतळावर कॅटरिनासाेबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती आणि अभिनेत्रीला चाहत्यांनी चारही बाजूंनी घेरले होते. यासगळ्यात अभिनेत्रीचे बाहेर पडणेही कठीण झाले होते. अशा स्थितीत अभिनेत्री पुढे जावी म्हणून तिच्या सिक्योरिटी गार्डने चाहत्यांना बाजूला ढकलले, ज्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल हाेत आहे. इतकेच नव्हे, तर साेशल मीडिया युजर्स व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत. कुणी या व्हिडिओवर अभिनेत्रीची बाजू घेत आहे, तर कुणी कॅटरिनाला ट्राेल करत आहेत.
View this post on Instagram
कॅटरिना कैफ पती विकी काैशलसाेबत सुट्टीसाठी न्यूयॉर्कला गेली होती. काही दिवसांपूर्वी विकी आणि कॅटरिनाचा एका चाहत्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही कॅज्युअल लूकमध्ये फॅन्ससोबत पोज देताना दिसले. हा फोटो फॅन पेजने शेअर केला आहे.
View this post on Instagram
कॅटरिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ती लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीचे चाहते तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी खुपच आतुर आहेत.(bollywood a katrina kaif staff pushes fans away as she get mobbed by crowd at mumbai airport video viral )
अधिक वाचा-
–HAPPY BIRTHDAY | ’एमएस धोनी’ चित्रपटापेक्षा वेगळी आहे माहीची लव्हस्टोरी? ‘अशी’ झाली होती साक्षीसोबत पहिली भेट
–‘जवान’ चित्रपटचा ट्रेलर लॉन्च हाेण्यापूर्वी नयनताराचा लूक झाला लीक? साेशल मीडियावर उडाली खळबळ