बापमाणसं! बॉलीवूडमधील असे कलाकार, ज्यांनी अनाथांना दत्तक घेत जगासमोर ठेवला आदर्श

बॉलिवूडचे कलाकार नेहमी लॅव्हिश लाईफस्टाईल आणि मौजमजा करण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा बेफिक्र अंदाज, नेहमीच लोकांच्या चर्चेचा एक भाग असतो. बॉलिवूड आणि बॉलिवूडमधील कलाकारांवर नेहमीच कोणते ना कोणते आरोप होत असतात. समाजात खराब गोष्टी पोहचविण्याचे काम बॉलिवूडमधून केले जाते असे देखील बऱ्याचदा बोलले जाते. मात्र याच बॉलिवूडची आणि यातील कलाकारांची एक दुसरी बाजू आहे, ज्यात त्यांनी अनेक उत्तम कामं केली आहेत. त्यातीलच एक म्हणजे अनेक अनाथ मुलांचे पालकत्व या कलाकारांनी स्वीकारून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. सोबतच या अनाथ मुलांना हक्काचे घर आणि नाव देण्याचा मोठा आणि वाखाणण्याजोगा प्रयत्न त्यांनी केला आहे. अनेक मोठ- मोठ्या कलाकारांची नावं या यादीत आहेत. चला तर मग पाहूया अशाच काही कलाकारांची नावे.

सुश्मिता सेन :
मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनने बॉलिवूडमध्ये जम बसवत असतानाच २००० साली रेनी नावाच्या मुलीला दत्तक घेतले. सुश्मिता विवाहित नसल्याने तिला या दत्तक घेण्यात अनेक अडथळे देखील आले. तरीही तिने तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मुलीला दत्तक घेतले. त्यानंतर तिने २०१० साली अलिशा नावाच्या दुसऱ्या मुलीला देखील दत्तक घेतले. आज सुश्मिता तिच्या या मुलींमध्ये खूप आनंदित असून नुकतंच तिने तिच्या मोठ्या मुलीचा २१ वा वाढदिवस देखील साजरा केला.

मिथुन चक्रवर्ती:
बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे मिथुनदा हे खऱ्या आयुष्यात ‘बापमाणूस’ निघाले. मिथुन यांनी त्यांच्या ‘दिशानी’ नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे. मिथुन यांना ही मुलगी एका कचऱ्याच्या डब्ब्यात फेकलेली मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तिला रीतसर दत्तक घेतले. मिथुन आणि योगिता बाली यांनी दिशानीला त्यांच्या तीन मुलांइतकेच प्रेम दिले. दिशानीने तिचे शिक्षण पूर्ण केले असून लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशा चर्चा आहेत.

रवीना टंडन:
ज्या वयात मुलं, मुली फक्त आणि फक्त पैशाचा विचार करतात त्या वयात रवीना दोन मुलींची आई होती. रवीनाने वयाच्या २१ व्या वर्षी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले. रवीना १९९५ साली या दोघींना दत्तक घेत त्याचे पालकत्व घेतले. रवीनाने तिच्या छाया मुलीचे लग्न लावून दिले असून रवीना आजी देखील झाली आहे.

सलिम खान:
खान परिवाराचा बॉलिवूडमधील दबदबा सर्वानाच माहित आहे. सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी त्याच्या सर्वात लहान मुलीला म्हणजेच अर्पिताला दत्तक घेतले आहे. आज खान कुटुंबाचे आयुष्य असलेली अर्पिता कधीकाळी सलीम खान यांना रस्त्यावर सापडली होती. अर्पिता ही सलमानच्या अगदी जवळची मानली जाते. काही वर्षांपूर्वीच अर्पिताचे अभिनेता आयुष्य शर्मा सोबत लग्न झाले असून ती आज दोन मुलांची आई आहे.

सुभाष घई:
एकापेक्षा एक सरस आणि हिट सिनेमे देणाऱ्या शोमॅन सुभाष घई यांनी देखील त्यांच्या मेघना नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे. लंडनमध्ये शिकलेली मेघना घई यांच्या प्रॉडक्शन कंपनीची आणि ऍक्टिंग स्कुलची जबाबदारी सांभाळते. तिने राहुल पुरी सोबत लग्न केले आहे.

हेही वाचा-
जेव्हा भले भले सुपरस्टार मागे लपत होते, तेव्हा प्रीतीने अंडरवर्ल्ड डॉनविरूद्ध दिली होती साक्ष
मोनिका बेदीचा वाढदिवस! आजवर खुप काही ऐकलं असेल, आता वास्तव वाचा; अंडरवर्ल्डसोबत नाव जुडताच अभिनेत्रीचे असे झाले हाल
या अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंमुळे २० रुपयांचं मासिक १०० रुपयांना झालं, मात्र नंतर नशीब फिरलं आणि…
एकेवेळी पाकिस्तानमधून धमकीचा फोन आलेले कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव आधी करायचे हे काम!

Leave A Reply

Your email address will not be published.