Friday, May 24, 2024

‘टिकू वेड्स शेरू’च्या सक्सेस पार्टीत कंगनाने अवनीतसोबत लावले जाेरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री कंगना राणौत निर्मित ‘टिकू वेड्स शेरू‘ हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशात मुंबईत या चित्रपटाची ग्रँड सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होत, ज्यामध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट पोहोचली होती. पार्टिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कंगना रणौत डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या पार्टीच्या या व्हिडिओमध्ये, कंगना रणौत (kangana ranaut) चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अवनीत कौर (avneet kaur) हिच्यासोबत जबरदस्त डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये कंगना ऑफ शोल्डर रेड ड्रेससह गोल्डन कलरची हील्स परिधान करून अतिशय सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, अवनीत देखील काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून पार्टीमध्ये नाचताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

व्हिडिओमध्ये दाेघीच्यांही चेहऱ्यावर चित्रपटाच्या यशाचा आनंद स्पष्ट दिसत असून त्या डान्स फ्लोअरवर थिरकत आहेत. कंगना आणि अवनीतच्या या व्हिडिओवर चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मंडळी, ‘टिकू वेड्स शेरू’ 23 जून रोजी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला होता. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘चंद्रमुखी 2’चा देखील समावेश आहे, जो यावर्षी गणेश चतुर्थीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करण्यासोबतच कंगनाने ‘राघव लॉरेन्स’चे फर्स्ट लूक पोस्टरही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत.(bollywood actress kangana ranaut danced with avneet kaur at tiku weds sheru party see video viral )

आधिक वाचा- 
उर्फीच्या नव्या आऊटफिटने ओलांडल्या सर्व मर्यादा; युजर्स ट्रोल करत म्हणाले, ‘तिने हे देखील का घातले…’
अनन्या पांडेने आदित्य राॅय कपूरसाेबतच्या नात्यावर साेडले माैन; म्हणाली, ‘लोकांना अंदाज लावू द्या…’

हे देखील वाचा