Sunday, May 19, 2024

अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून अभिनेत्रीने साेडले लाॅ काॅलेज, वाचा काय म्हणाली करीना?

बॉलिवूड स्टार्सच्या नवीन किंवा जुन्या मुलाखती सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. यानंतर कधीकधी कलाकरांना प्रचंड ट्राेलिंगचाही सामना करावा लागताे. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिला देखील सध्या एका जुन्या मुलाखतीत लाॅचा अभ्यास करण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ट्रोल केले जात आहे.  हा व्हिडिओ दिग्गज अभिनेत्री सिमी गरेवालच्या प्रसिद्ध टीव्ही शो’रेंडेझ्वस विथ सिमी ग्रेवाल’चा आहे, ज्यामध्ये करीना कपूर म्हणाली की, लाॅचा अभ्यास करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, म्हणून तिने लॉ कॉलेज सोडले. या व्हिडिओमुळे करिनाला साेशल मीडियावर चांगलेच ट्राेल केले जात आहे. युजर्स तिच्या या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत.

सिमी ग्रेवालचा शो ‘रेंडेझ्वस विथ सिमी ग्रेवाल’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय टॉक-शो आहे. या शाेमध्ये शाहरुख खान ते माधुरी दीक्षित असे अनेक प्रसिध्द कलाकार आले आहेत. सिमी ग्रेवालनेही याच शोमध्ये बॉलिवूड स्टार करीना कपूरची मुलाखत घेतली होती, ज्याची क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

करिनाच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तिच्या शिक्षणाची चर्चा सुरू झाली आहे. या मुलाखतीत करीना असे म्हणताना ऐकू येते की, तिने लाॅचे शिक्षण कसे अर्धवट सोडले. करीना म्हणते, “मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये गेले तेव्हा मी नकाे त्या टप्प्यातून गेले होते. यानंतर माझे कुटुंबीय खूप नाराज झाले हाेते. कॉलेजमधील माझ्या वागण्याबाबत घरच्यांनी सांगितले की, तू कॉलेजमध्ये जाऊन असे कसे करू शकते, ज्यावर मी सामान्य मुलीसारखी प्रतिक्रिया देत होते. नंतर मला समजले की, मला त्याचा कंटाळा येतं आहे आणि या अभ्यासासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागेल, म्हणून मी कॉलेज सोडले.”

या मुलाखतीच्या व्हिडिओ क्लिपवरून चाहते करीना कपूर खानला ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “कपूर कुटुंबात चांगले शैक्षणिक विद्यार्थी नाहीत, त्यांच्याकडे फक्त कलाकार आहेत.” मात्र, करीना कपूरची यशस्वी चित्रपट कारकीर्द पाहता तिने लाॅचे शिक्षण सोडणे हा चुकीचा निर्णय होता असे म्हणणे वावगे ठरणार नाही.(bollywood actress kareena kapoor quit law school too much hard work rendezvous with simi garewal)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही एक पाऊल पुढे आलो आहोत…’, अभिनेत्री अश्विनी महांगडेने हाती घेतला नवीन वसा

माेठा खुलासा! शोमध्ये टेलिप्रॉम्प्टरवर पाहून कपिल शर्मा सांगताे जाेक्स; युजर्स म्हणारले, ‘आमचे पंतप्रधान…’

हे देखील वाचा