भयंकर! ‘या’ अभिनेत्रीची आणि कुटूंबाची झाली होती रॉडने हत्या; ६ डेडबॉडी गाडल्या होत्या खड्ड्यात, ७ दिवस खणखणत होता फोन

Bollywood actress laila khan's died story


बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. काहींच्या मृत्यूचे अद्यापही कारण स्पष्ट झाले नाही. अनेक कलाकारांनी आत्महत्या देखील केली आहे. यामध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिच्या मृत्यूबद्दल वाचून तुम्ही हैराण व्हाल.

अभिनेत्री ‘लैला खान’ हीचा जन्म पाकिस्तानमधे झाला होता. ‘सलेना पटेली’ हे तिच्या आईचे नाव होते. सलेना यांनी 3 लग्न केली होती. सलेनाचे पहिले लग्न नादिर शाह पटेल यांच्यासोबत झाले होतें. त्या दोघांना एक मुलगी झाली. आणि त्यांनी तीच नाव ‘लैला’ असं ठेवलं.

लैला खान हिने 2008 मध्ये ‘वफा: अ डेडली लव्ह स्टोरी’ या चित्रपटात राजेश खन्ना याच्यासोबत काम केले. या चित्रपटाचा दिग्दर्शक राखी सावंतचा भाऊ ‘राकेश सावंत’ हा होता. परंतु या चित्रपटाने तिला फार काही यश मिळवून दिले नाही. त्यानंतर ती बॉलिवूडमधील बी आणि सी ग्रेडच्या चित्रपटात काम करू लागली. तीला मुंबईमध्ये आल्यावर खूपच संघर्ष करावा लागला. परंतु त्यावेळी तिची आई सलेना ही खूप श्रीमंत होती. ती तिची सगळी प्रॉपर्टी विकून दुबईला शिफ्ट झाली.

याच दरम्यान लैलाने मुनीर खान याच्यासोबत लपून लग्न केले आणि तिच्या फिमी करिअरला काही धक्का लागू नये म्हणून तिने ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवली.

फेब्रुवारी 2011 ला अचानक लैलाचे संपूर्ण कुटुंब बेपत्ता झाले. त्यावेळी लैला 30 वर्षाची होती. त्यावेळी लैलाच्यग कुटुंबाच्या जवळच अस कोणीच नव्हत की ज्यांना त्यांची काळजी असेल. या सोबतच लैला ही बरेच दिवस बेपत्ता होती. त्यावेळी राकेश सावंत यांनी तिला कॉल केला परंतु तिने काही फोन उचलला नाही. त्यानंतर आणखी काही व्यक्तींनी लैलाला फोन केला परंतु तिने त्यांचा देखील फोन उचलला नाही.

लैला बरेच दिवस बेपत्ता असल्याने राकेश यांना तिची काळजी वाटायला लागली. त्यानंतर त्यांनी तिच्या आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की , लैला बरेच दिवस झाले घरी आलीच नाहीये. तेव्हा त्यांनी लैला बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली.

या घटनेनंतर जवळपास दीड वर्षांनी पोलिसांनी एका व्यक्तीला एका गुन्हा बाबतीत अटक करतात. विचारपूस केल्यावर असे समजले की , त्याच नाव ‘परवेज टाक’ हे आहे. त्यावेळी परवेजची संपूर्ण चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने सांगितले की, मुंबईतील फार्म हाऊस मधील स्विमिंग पूलजवळ त्याने सहा खड्डे घेऊन सहा मृतुदेहांना पुरले होते. तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की लैलाच्या घरातील जी सहा माणसे बेपत्ता झाली होती, त्यातील एक व्यक्ती जिवंत आहे आणि तो परवेज आहे. त्या खड्यांमध्ये त्यांना मोबाईल देखील गाडले होते, ज्यातील फक्त लैलाचा मोबाईल चालू होता. या फोनवर तब्बल ७ दिवस फोन येत होते. परंतु नंतर बॅटरी संपल्याने तिचा मोबाईल देखील स्विच ऑफ झाला.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समजले की, लैलाच्या आईने सलेनाने पैशासाठी परवेज सोबत लग्न केले होते. ती तिची सर्व प्रॉपर्टी विकून दुबईला शिफ्ट झाली होती. कारण तिला भीती होती की पोलिस तिला अटक करतील.

7 फेब्रुवारीला लैलाचे कुटुंब फार्म हाऊसवर पार्टी साठी गेले होतें. त्यावेळी परवेज देखील त्यांच्या सोबत होता. सालेना आणि परवेज यांचं त्या रात्री प्रॉपर्टी वरून खूप भांडण झालं आणि रागात परवेज यांनी सलेनाचा खून केला केला.

त्यावेळी तिथे त्या फार्म हाऊसची काळजी घेणारा ‘शाकीर हुसैन’ देखील हजर होता. त्या दोघांनी मिळून लैलाला आणि तिच्या कुटुंबातील सगळ्यांना लोखंद्याच्या रॉडने मारून टाकले. परवेज आणि शाकीरने स्विमिंग पूलच्या इथे खड्डे घेऊन त्या सगळ्यांना त्या खड्यात पुरले आणि दोघेही पळून गेले. पण त्यानंतर परवेजला दुसऱ्या केसमध्ये अटक झाली व सत्य जगासमोर आले.


Leave A Reply

Your email address will not be published.