वेदनादायक आहे अभिनेत्रीची कहाणी, ‘या’ दिग्दर्शकासोबतच्या अफेअरमुळे गमवावे लागले प्राण

साठ- सत्तरच्या दशकातील अभिनेत्री प्रिया राजवंश (Priya Rajvansh) आज आपल्यात नाहीत. प्रिया यांच्याशी संबंधित असे बरेच काही आहे, ज्याच्या आठवणी त्यांच्या गेल्यानंतरही लोकांच्या मनात ताजी आहे. प्रियाचे संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे होते. अभिनेत्रीने १९६४ मध्ये ‘हकीकत’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि हा चित्रपट त्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक होता. देव आनंदचा मोठा भाऊ चेतन आनंद यांनी प्रियाला चित्रपटात आणले होते. जे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखका, दिग्दर्शक आणि निर्माते होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रिया राजवंशने त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये चेतन यांच्या सोबत सर्वाधिक चित्रपट केले होते. या चित्रपटांमध्ये ‘हीर रांझा’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘हंसते जख्म’, ‘साहेब बहादूर’, ‘कुदरत’ आणि ‘हाथों की लकीरें’ या चित्रपटांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतन आनंदची प्रिया वंशासोबतची जवळीक वाढू लागली आणि प्रिया देखील चेतनला खूप पसंत करू लागल्या. (bollywood actress priya rajvansh tragic life story facts)

चेतन यांचे आधीच लग्न झाले होते. पण ते पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत होते. असे म्हटले जाते की, चेतन आणि प्रियाने एकत्रित खूप चांगला वेळ घालवला. पण अभिनेत्रीच्या आयुष्यात ट्विस्ट १९९७ मध्ये चेतनच्या मृत्यूनंतर आला. चेतन गेल्यानंतर जेव्हा मृत्यूपत्र वाचण्यात आले, तेव्हा असे दिसून आले की चित्रपट निर्मात्याने त्यांची सर्व मालमत्ता प्रिया राजवंशला दिली होती.

चेतन आनंदच्या दोन्ही मुलांना ही गोष्ट अजिबात पटली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतन यांची दोन्ही मुले वडिलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असत आणि प्रियावर खूप चिडत असत. हीच गोष्ट प्रियाच्या गळ्याता फास बनली होती आणि त्यामुळेच त्यांची हत्याही करण्यात आली होती, असे सांगितले जाते. प्रिया यांच्या हत्येचा आरोप चेतन यांच्या दोन्ही मुलांवर लावण्यात आला होता. बातम्यांनुसार, प्रिया यांची केस आजपर्यंत कोर्टात सुरू आहे.

Latest Post