‘बिग बॉस 13‘ फेम शहनाज गिलने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी जान‘ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाद्वारे भाईजान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. अशात, एका मुलाखतीदरम्यान शहनाजने तिला भविष्यात कोणत्या प्रकारचे चित्रपट करायचे आहेत याचा खुलासा केला आहे. काय म्हणाली शहनाज गिल? चला, जाणुन घेऊया…
एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शहनाज गिल (shehnaaz gill) हिने सांगितले की, तिला असे चित्रपट करायचे आहेत की, ‘ज्यांच्याशी लोक जोडू शकतील.’ ती पुढे म्हणाली की, ‘तिला सर्व प्रकारची पात्रे साकारायची आहेत.’ यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेचा उल्लेख करत ती म्हणाला की, ‘मला तिच्यासारखे चित्रपट करायचे आहेत.’
View this post on Instagram
राधिका साकारते आव्हनात्मक पात्र
‘किसी का भाई किसी की जान’ अभिनेत्रीच्या मते, ‘राधिका खूप आव्हानात्मक पात्रे साकारते, ज्यामुळे तिची एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण होते.’ राधिका आपटेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर राधिका नुकतीच ‘मिसेस अंडरकव्हर’ या स्पाय कॉमेडी चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट G5 वर प्रदर्शित झाला होता.
याआधी राधिकाने ‘पॅड मॅन’, ‘द वेडिंग गेस्ट’, ‘लस्ट स्टाेरी’, ‘रात अकेली है’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actress shehnaaz gill would like challenging characters in movies like radhika apte)
निक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दगडाची किंमत वाढवत आहे” घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्री पोस्ट झाली व्हायरल
दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…