टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी अशा स्टार किड्सपैकी एक आहे, जी नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. पलक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून कायमच चाहत्यांचे लक्ष वेधते. दरम्यान, पलकने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे तीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती निळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करून मालदीवमधील स्विमिंग पूलमध्ये पाेज देताना दिसत आहे, ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री पलक तिवारी (palak tiwari) हिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असून ती हॉट पोज देताना दिसत आहे. यासाेबत अभिनेत्री समाेर फ्लोटिंग ब्रेकफास्टही ठेवण्यात आला आहे. पहिल्या दोन फाेटाेंमध्ये, ती स्विमिंगपूलच्या बाजूला बसून फ्लोटिंग ब्रेकफास्टसह फोटोशूट करताना दिसत आहे, तर तिसर्या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या आत उभी आहे आणि ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. पलक तिवारीने हे बाेल्ड फोटो शेअर करत लिहिले,
“मी पण ब्रेकफास्टसोबत पोहत आहे.”
View this post on Instagram
पलक तिवारी मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिच्या या फाेटाेंना 6 तासात 1 लाख 63 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याच वेळी, फाेटाेंवर 740 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. अशात अभिनेत्रीच्या अनेक चाहत्यांनी यावर हार्ट आणि फायर इमोजी देखील शेअर केले आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “हॉट.”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले आहे, “मला तुझी नजर काढू दे.” अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तुझी आई तुझ्यापेक्षा जास्त हॉट आहे.”
पलक तिवारीने अलीकडेच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय शहनाज गिलही महत्त्वाची भूमिका होती. मात्र, हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.(bollywood actress shweta tiwari daughter palak tiwari bold photos in blue color monokini fans says her mom is more hotter than her )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही…” अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
“जास्तीत जास्त वेळ घालवायचा…सोपं नव्हतं…”; ‘आई’ असलेल्या मधुराणी गोखलेची पोस्ट व्हायरल