Tuesday, May 21, 2024

ड्रेसच्या नावावर कपडे गुंढाळून बाहेर आली उर्फी जावेद; लोकांनी कमेंट करताच म्हणाली, ‘पकडून मार…’

आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद (urfi jawed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेद अनेकदा तिच्या विचित्र ड्रेसमुळे चर्चेत येते. उर्फीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी उर्फीची नवीन पोस्टही चर्चेत आहे.

उर्फी जावेदच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर तिने बोल्ड स्टाइलमध्ये तपकिरी रंगाचा ब्लाउज आणि अनोखा कट स्कर्ट घातला होता. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा दुपट्टा घेतला आहे. तिचा एकंदर लुक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेक-अप केला आहे. तसेच तिचे केस मोकळे सोडले आहे.

या आउटफिटमधली उर्फी जावेद अनेकांना आवडली पण काही लोकांनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल केले. यावेळी उर्फी पापाराझीवर रागावली आणि म्हणाली की, ‘मी गेल्यावर त्याला मारतील. हा व्हिडिओ अनेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र आउटफिट्समुळे ट्रोल होत असते. उर्फीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिला बिग बॉस ओटीटी शोनंतर प्रसिद्धी मिळाली. या शोमधील उर्फीचा प्रवास कदाचित एक आठवडाच टिकला असेल, परंतु शो सोडल्यानंतर ती सोशल मीडियावर खळबळ माजली.

उर्फीच्या अभिनय शोबद्दल बोलायचे तर तिने अनेक मोठ्या शोमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. तिने ये रिश्ता क्या कहलाता है, बडे भैया की दुल्हनिया, चंद्रा नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्ना, साथ फेरो की हेरा फेरी दायन यांसारखे शो केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

9 लाखाचे घड्याळ, 1.5 लाखाचे शूज आणि 5 मॅनेजर, ऑरिची लक्झरी लाइफ ऐकून सलमान खानलाही अवाक
कोट्यवधींचा मालक असून फाटलेले बूट घालून सलमान खान पोहचला कार्यक्रमात; चाहते म्हणाले, ‘सलमान भाई…’

हे देखील वाचा