Friday, April 26, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाला झाल्या होत्या रक्ताच्या उलट्या; २८ दिवसांनंतर डिस्चार्ज मिळाल्यावर सांगितली व्यथा

बॉलिवूडमधील दिग्गज निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी हे मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. ते शनिवारी (5 जून) 28 दिवसानंतर हॉस्पिटलमधून घरी आले आहेत. त्यांच्या या आजाराबाबत त्यांच्या घरच्यांनी सगळी माहिती लपवून ठेवली होती. केवळ बॉलिवूडमधील अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना याबाबत सर्व माहिती होती.

पहलाज निहलानी यांनी नुकतेच इंग्रजी वेबसाईट टाईम्स ऑफ इंडियासोबत बातचीत करताना त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आताच काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा मला बघायला हॉस्पिटलमध्ये आले होते. परंतु आम्ही ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवली. मी नानावती हॉस्पिटल आणि तिथून सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो की, त्यांनी माझी एवढी काळजी घेतली. एका रात्री अचानक मला रक्ताची उलटी झाली त्यानंतर मला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.”

त्यांनी पुढे सांगितले की, “हे सगळे फूड पॉयझनिंगमुळे झाली होते. सुरुवातीला 5-6 दिवस मी आयसीयूमध्ये होतो. मला वाटले 2 दिवसात मी घरी जाईल, पण आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर माझा ताप वाढत होता. तसेच माझ्या पोटात देखील दुखत होते.”

पहलाज निहलानी हे बॉलिवूडमधील एक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘हथकडी’, ‘शोला और शबनम’, ‘अंदाज’, ‘तलाश’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ते 2015 पासून 2017 पर्यंत सीबीएफसीचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात ते खूप चर्चेत होते. 2017 मध्ये त्यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याजागी गीतकार प्रसून जोशी हे रुजू झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा