Thursday, March 28, 2024

‘बाळासाहेब आजही आपल्यात आहेत’, जेव्हा ‘हे’ पाच सिनेमे पाहाल तेव्हा तुम्हीही असंच म्हणाल

हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांनी आयुष्यभर मराठी माणूस आणि भगवा या दोन गोष्टींसाठी झोकून काम केले. त्यांनी कधीही कोणतीच निवडणूक लढवली नाही तरी त्यांच्या कामाने त्यानी त्यांचे स्थान खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. बाळासाहेबांनी सुरुवातीला तात्यांचे काम फक्त राजकारांपुरतेच मर्यादित ठेवले होते. मात्र हळूहळू चित्रपटसृष्टीत देखील त्यांनी कलाकारांसाठी काम करायला सुरुवात केली. त्यातून त्यांचे कलाकार आणि चित्रपटांशी नाते दृढ व्हायला सुरुवात झाली.
बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व, त्यांचे वक्तृत्व आणि त्यांचा लुक हे इतके लोकप्रिय होते, की बाळासाहेबांवरून प्रेरित होऊन अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी त्याच्या चित्रपटात कलाकरांना थोडेफार त्यांच्यासारखे दिसणार त्यांच्याशी मिळतेजुळते लूक्स आणि रोल दिले होते. त्यात सरकार, झेंडा आदी चित्रपटांचा समावेश आहे. ह्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत, असेच काही रोल जे बाळासाहेबांवरून प्रेरित झाले होते.

नरसिम्हा :
हा ऍक्शन ड्रामा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. सनी देओल, उर्मिला मातोंडकर, डिंपल कपाडिया, रवी बहल आणि ओम पुरी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमातील ओम पुरी यांचा लुक बाळासाहेबांशी मिळत जुळत होता. ‘सूरज नारायण सिंह उर्फ ​​बापजी’ असे त्याच्या भूमिकेचे नाव होते. हा बापजी गावातील सावकार असून तो त्याच्या बाळाच्या जोरावर संपूर्ण गावावर स्वतःची एकहाती सत्ता निर्माण करणायचा प्रयत्न करत असतो.

बॉम्बे :
मणिरत्नम दिग्दर्शित ‘बॉम्बे’ हा सिनेमा १९९२-९३ साली झालेल्या दंगलींवर आधारित आहे. हा सिनेमा एक हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलीच्या प्रेमकथेवर आहे. या चित्रपटातील शक्ती समाजचा अध्यक्ष म्हणजेच टिनू आनंद यांचा लुक बाळासाहेबांवरून प्रेरीत होता. सिनेमात टिनू यांनी भगवे कपडे, रुद्राक्ष माळ घातले आहे. हा अध्यक्ष त्याच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंसाचाराला हवा देत असतो.

राज का रण :
२०१४ साली आलेल्या या चित्रपटात रमेश देव यांनी साकारलेला काकासाहेब नागरे हा नेता अगदी सेम तो सेम बाळासाहेबांची कॉपी होता. शिवाय चित्रपटाची कथा देखील ठाकरे घराण्यावर आधारित होती. सिनेमाच्या पोस्टर दिसणारा डरकाळी फोडणारा वाघ आहे, रुद्राक्षांच्या माळांनी वेढलेले हात, भगवे वातावरण आणि डोळ्यांवर स्टाईलने गॉगल चढवून तिरमिरीत बोलणारा नेता यावरूनच समजुदार माणसाला सिनेमा आणि त्या नेत्याबद्दल समजणार इतके साधर्म्य होते.

झेंडा :
२००९ साली आलेला हा सिनेमा अवधूत गुप्ते यांनी दिग्दर्शित केला होता. ‘झेंडा’ हा मराठी चित्रपट बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कुटुंबावर आधारित आहे. बाळासाहेबांच्या घरातच सत्तेवरून झालेला संघर्ष आणि त्यातून दोन भावांमध्ये निर्माण झालेली दरी यावर हा सिनेमा भाष्य करतो.या चित्रपटात एका पक्षातील नेत्यावर आधारित विशिष्ट राजकीय पक्षाची उपासना करणारे कार्यकर्त्यांची दुर्दशा दाखविण्यात आली आहे.

बाळकडू :
२०१५ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय आदर्शांचे दर्शन घडवले आहेत. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या मुंबईतूनच हळूहळू मराठी आणि मराठी माणूस हद्दपार होत आहेत. त्यामुळेच आजच्या तरुणांना मराठी आणि महाराष्ट्रचे बाळकडू मिळावे या उद्देशाने ह्या सिनेमाची निर्मिती झाली आहे. या चित्रपटात बाळासाहेबांचाच आवाज वापरण्यात आला आहे.

सरकार, सरकार राज, सरकार ३ :
राम गोपाळ वर्मा दिग्दर्शित सरकार हा सिनेमा २००५ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर २००८ ला सरकार राज आणि २०१७ ला सरकार ३ सिनेमे प्रदर्शित झाले. हे तिन्ही चित्रपट संपूर्णपणे बाळासाहेबांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका त्याची वेशभूषा सर्व बाळासाहेबनवरून घेण्यात आले आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी सांगितले की, त्यांनी सिनेमातील बरेच संवाद बाळासाहेबांचे कॉपी केले आहेत.

ठाकरे :
२०१९ साली आलेला हा सिनेमा बाळासाहेबांची बायोपिक होता. ह्या सिनेमातून बाळासाहेबांच्या लढायची सुरवात ते त्यांना बहाल झालेल्या हिंदुहृदयसम्राट ह्या किताबापर्यंत त्यांचे संपूर्ण जीवन दाखवण्यात आले आहे. यात नवाझुद्दिन सिद्दकी याने बाळासाहेबांची तर अमृता रावने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

 

 

हे देखील वाचा