Friday, April 19, 2024

‘या’ दिग्दर्शकिने कापले स्वत:चेच केस आणि पाठवले चित्रपट महाेत्सवात, समाेर आले धक्कादायक कारण

27व्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शुक्रवार (दि. 9 डिसेंबर)पासून सुरुवात झाली. या महोत्सवात महनाज मोहम्मदी यांना ‘स्पिरिट ऑफ सिनेमा’ पुरस्कार देण्यात आला. मात्र, हा सन्मान स्वीकारण्यासाठी इराणी दिग्दर्शिकिने महनाझ स्वत: या सोहळ्याला पोहोचू शकल्या नाहीत, पण स्वत: ऐवजी त्यांनी आपले कापलेले केस संदेशसह फेस्टिव्हलला पाठवले. दिग्दर्शकाची ही शैली खूप पसंत केली जात आहे.

केरळ फिल्म फेस्टिव्हल 2022 धमाकेदारपणे सुरू आहे. या चित्रपट महोत्सवात देशभरातील आणि जगभरातील अभिनय जगताशी संबंधित सर्व दिग्दर्शकांचा गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच अनेक मोठे चित्रपटही येथे दाखवले जाणार आहेत. मात्र, हा चित्रपट महोत्सव सध्या एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहे. इराणी दिग्दर्शक महनाज मोहम्मदी (mahnaz mohammadi) यांनी केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपले केस कापून पाठवल्याचे वृत्त आहे.

केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महनाज मोहम्मदी यांना ‘स्पिरिट ऑफ सिनेमा’ पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र, महिलांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्यामुळे मेहनाज इराणच्या बाहेर जाऊ शकत नाही. या महान कारणामुळे त्यांनी त्यांचे कापलेले केस मैत्रिणी आणि ग्रीक चित्रपट निर्मात्या अथेना रॅचेल त्सांगारी हिला एका खास संदेशासह चित्रपट महोत्सवात पाठवले.

इराणी दिग्दर्शिका मेहनाज या दिग्दर्शनासोबतच सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. इराणमधील महिलांची स्थिती अशी आहे की, त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. त्यामुळे त्यांना मोकळेपणाने जगण्याचा हक्क मिळावा या मागणीसाठी महिला केस कापून आणि हिजाब जाळून निषेध करत आहेत. यामुळे इराणी दिग्दर्शकिला इराणच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही.

या चित्रपट महोत्सवात त्यांच्या जागी त्यांची मैत्रिण अथिना हिला दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. तिने मेहनाजचे कट केलेले केसही तेथील प्रेक्षकांना दाखवले, त्यासोबत अथिनाने त्यांचा मेसेजही वाचला, ज्यामध्ये महनाजने लिहिले की, “हे माझे केस आहेत, जे मी माझी वेदना व्यक्त करताना कापले आहेत. यातून माझ्या वेदना दिसून येतात. मी तुम्हाला हे पाठवत आहे कारण, या दिवसात आम्हाला आमचे हक्क मिळवण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे.”

अश्या संदेश दिग्दर्शिका महनाज मोहम्मदी यांनी मैत्रिण जवळ पाठवला. (bollywood iranian director mahnaz mohammadi send his chopped hair to kerala film festival know what is the reason)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
एअरलाईन्सच्या निष्काळजीपणामुळे अभिनेत्रीची हरवली बॅग, ट्विटद्वारे व्यक्त केला संताप

पतीवर लावला चाकूहल्ल्याचा आरोप, तर ‘या’ कारणामुळे रति अग्निहोत्री गेल्या होत्या चित्रपटांपासून लांब

हे देखील वाचा