न्यायालयाकडून आमिर खानसह ४ जणांविरुद्ध नोटीस जारी, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाशी निगडीत प्रकरण


सन २०१८ साली विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट रिलीझ झाला होता. या चित्रपटात अनेक अनुभवी कलाकारांचा समावेश होता, परंतु तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला. आता हाच चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूड सुपरस्टार आणि ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ अशी ओळख असणाऱ्या आमिर खानला या चित्रपटासंदर्भात नोटीस जारी केली आहे. आमिरसह आEAणखी चार जणांचाही यामध्ये समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपुरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार हंसराज चौधरी यांनी दाखल केलेल्या आढावा याचिकेवर जौनपुर जिल्हा न्यायाधीशांनी नोटीस बजावली आहे. यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात मल्लाह समुदायाबद्दल चुकीची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले की, मल्लाह समुदायासाठी ‘फिरंगी’ आणि ‘ठग्स’ सारख्या शब्दांचा वापर केला आहे. चित्रपटात आमिर खानच्या पात्राचे नाव न सांगता फिरंगी मल्लाह ठेवण्यात आले.

माध्यमांतील वृत्तानुसार, जौनपुरच्या जिल्ह्याचे न्यायाधीश मदन पाल सिंग यांनी मंगळवारी (२ मार्च) बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानसोबत इतर चार व्यक्तींना नोटीस जारी केली. याचिकेत ‘मल्लाह’ समुदायाचा अपमान करत मानहानी आणि भावनांना ठेच पोहोचवण्याचा आरोप करण्यात आला आहे. आमिर खान आणि इतर चार जणांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस जारी केली आहे. येत्या ८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल.

हंसराज चौधरी यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा, दिग्दर्शक विजय कृष्णा आणि आमिर खानविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये म्हटले होते की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘मल्लाह’ जातीला ‘फिरंगी मल्लाह’ म्हणत अपमान केला आहे. चित्रपटाचा टीआरपी वाढवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने हे सर्व दाखवण्यात आले होते. चित्रपटात समुदायाला ठग्स आणि फिरंगी सांगण्यात आले आहे. आमिरला चित्रपटात ‘फिरंगी मल्लाह’ संबोधले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.