Saturday, April 20, 2024

‘मी आत्महत्या…’, तनुश्री दत्ताच्या ताज्या पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करून सर्वांना हैराण करणारी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली असून, तिला वाईटरित्या त्रास दिला जात आहे असल्याचे आणि लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले. बॉलीवूड माफिया, राजकीय सर्किट आणि राष्ट्रविरोधी घटकांमुळे ती खूप अडचणीत अडकल्याचेही तिने म्हटले आहे.

तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये तिच्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे, हे सविस्तर सांगितले आहे. अनेक गंभीर आरोप करत तिने आपला दृष्टिकोन मांडला आहे. यासोबतच तिने सर्वांना मदतीचे आवाहनही केले आहे. (tanushree dutta reveals she is being harassed and targeted)

पाण्यात मिसळले औषधी, स्टिरॉइड्स
तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला वाईटरित्या त्रास दिला जात आहे आणि लक्ष्य केले जात आहे. कृपया काहीतरी करा! पहिले म्हणजे गेल्या वर्षभरात माझे बॉलिवूडमधील काम उद्ध्वस्त झाले. यानंतर माझ्या पाण्यात औषधे आणि स्टेरॉईड्स मिसळण्यासाठी एक मेड पाठवण्यात आली, ज्यामुळे मला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले.”

गाडीच्या ब्रेकशी छेडछाड, थोडक्यात वाचला जीव
तनुश्रीने पुढे सांगितले की, “मी मे महिन्यात उज्जैनला आले होते, तेव्हा माझ्या ब्रेकशी दोनदा छेडछेाड केली गेली आणि माझा अपघात झाला. मी मरता मरता वाचले आणि ४० दिवसांनी मुंबईला परत आले, जेणेकरून मला माझे सामान्य जीवन जगता येईल आणि काम करता येईल. आता माझ्या इमारतीतील फ्लॅटच्या बाहेर विचित्र वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.”

‘मी नक्कीच आत्महत्या करणार नाही’
तनुश्रीने असेही लिहिले आहे की, “मी निश्चितपणे आत्महत्या करणार नाही. कान उघडे ठेवून सर्वांनी ऐका आणि मी इथून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहीन आणि माझी पब्लिक करियर पूर्वीपेक्षा अधिक उंचीवर नेईन.”

तनुश्रीला खात्री आहे की, या सगळ्यामागे ‘MeToo’च्या गुन्हेगाराचा आणि त्या NGOचा हात आहे, ज्याला तिने एक्सपोज केले होते. तिने लिहिले की, “बॉलिवूड माफिया, महाराष्ट्राचे जुने राजकीय सर्किट (ज्यांचे अजूनही वर्चस्व आहे) आणि बेईमान राष्ट्रविरोधी गुन्हेगार घटक सामान्यतः लोकांना त्रास देण्यासाठी एकत्र काम करतात. मला खात्री आहे की, या सगळ्यामागे ‘MeToo’चे दोषी आणि मी उघड केलेल्या NGOsआहेत. नाहीतर मला का कोणी टार्गेट करून त्रास देतील. लाज वाटायला पाहिजे तुम्हांला!”

नाना पाटेकरांवर लावला होता ‘MeToo’चा आरोप
तनुश्री दत्ताने तिच्या पोस्टमध्ये बरेच काही सांगितले आहे आणि तिची व्यथा मांडली आहे. २०१८ मध्ये नाना पाटेकरांवर ‘MeToo’ सारखे गंभीर आरोप करून, ती चर्चेत आली होती. २००९मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांवर लैंगिक छळाचे आरोप झाले होते. त्यानंतर असे अनेक आरोप झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा