मराठी सिनेसृसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका व आपल्या परखड विचाराने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाबरोबरच शरद पोंक्षे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही सतत चर्चेत असतात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपली स्पष्ट मते मांडताना दिसत असतात. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर टिकाही होताना दिसत असते. आता अलिकडेच त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आडनावावरून वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, काही दिवसांंपुर्वी शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी राहुल गांधी यांच्या आडनावावरून वादग्रस्त टिप्पणी केली. ते म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी हे खरे गांधी नाहीत. ते खान आहेत. त्यांनी अॅफिडेव्हीट करून खान आडनाव बदलून गांधी असे आडनाव करून घेतले आहे. राहुल गांधी महात्मा गांधींचे वंशज नाहीत. गांधी आडनावाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी हा सर्व प्रकार केला आहे. राहुल गांधी हे फिरोज खान यांची पुढची पिल्लावळ आहे. हाच खरा इतिहास आहे.”
हा विकृत पोंक्षे अजुन काय बोलू शकतो
नथुरामची अवलाद… pic.twitter.com/5XJu1wcaU4— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 16, 2023
शरद पोंक्षे यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. शरद पोंक्षे यांच्यावर सातत्याने टिका होत आहे. त्यांनी केलेल्या टिकेवरून त्यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. “शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच. पण माणूस म्हणूनही नीच आहे”, अशी प्रतिक्रिया अतुल लोंढे यांनी ट्विटरद्वारे दिली.
शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच
पण माणूस म्हणून ही नीच आहे.— Atul Londhe Patil (@atullondhe) August 16, 2023
शरद पोंक्षे यांच्या वादग्रस्त विधानावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच. पण माणूस म्हणूनही नीच आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्याच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही देखील एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, “हा विकृत पोंक्षे अजून काय बोलू शकतो…नथुरामची अवलाद…” सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांच्यावर टिकेची झोड उडत आहे. (Congress leader Jitendra Awad responded to Sharad Ponkshe’s criticism of Rahul Gandhi)
अधिक वाचा-
–खळबळजनक! अभिनेत्री जरीन खानची प्रकृती चिंताजनक, रुग्नालयात केले दाखल
–ऐश्वर्यापासून ते शाहरुखपर्यंत ‘या’ कलाकारांच्या चित्रपटात झळकलीय ‘दयाबेन’, बी ग्रेड सिनेमातही केलं होतं काम