प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री जरीनची अचानक तब्येत बिघडली आहे. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बद्दल स्वत: जरीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. स्वत: जरीनने इन्स्टाग्रामवर स्टोरीचा फोटो शेअर करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.
जरीन खान (Zareen Khan) सध्या रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्रीला डेंग्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिला तापा आली आहे् आण अंगदुखीचाही त्रास होत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम (Actress Zareen Khan Instagram) स्टोरीद्वारे चाहत्यांना डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे. तसेच स्वच्छ आणि डासमुक्त वातावरण राखण्यासाठी आणि कीटकनाशकांचा वापर करण्यास सांगितले आहे. मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
त्यानंतर जरीनने आणखी एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये एक ज्यूसचा ग्लास दिसत आहे. फोटो शेअर करत जरीनने लिहिलं आहे ‘रिकव्हरी मोड’. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, ऑगस्ट 2023 च्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूचे 157 रुग्ण आढळले आहेत. बिग बॉस ओटीटी 2 फायनलिस्ट अभिषेक मल्हान देखील डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल आहे.
जरीन विषयी बोलायच झाल तर, जरीनला डॉक्टर व्हायचे होतं. मात्र योगायोगाने ती सिने इंडस्ट्रीमध्ये आली. 2010 साली तिने सलमानसोबत ‘वीर’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. जरीनला या सिनेमातून कॅटरिनाची डुप्लिकेट कॉपी ही ओळख मिळाली आहे. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यात ‘रेडी’, ‘हाऊसफुल 3’, ‘1991’, ‘हेट स्टोरी’ या हिंदी सिनेमांसोबतच काही पंजाबी, तेलगू चित्रपटांचा देखील समावेश आहे. जरीन सलमानच्या ‘रेडी’ सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होती. जरीन सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Housefull 3 fame actress Zareen Khan admitted to hospital)
अधिक वाचा-
–ऐश्वर्यापासून ते शाहरुखपर्यंत ‘या’ कलाकारांच्या चित्रपटात झळकलीय ‘दयाबेन’, बी ग्रेड सिनेमातही केलं होतं काम
–फक्त 250 रुपये होता ‘दयाबेन’चा पहिला पगार; रक्कम मिळताच ठेवली होती ‘या’ व्यक्तीच्या हातावर