Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल, पाहा काय आहे प्रकरण

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल, पाहा काय आहे प्रकरण

चित्रपट अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे करिना कपूर खानच्या गर्भधारणेशी संबंधित वादग्रस्त पुस्तकाचे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयात पोहोचले आहे. यासंदर्भात बुधवारी झालेल्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायमूर्ती डीके पालीवाल यांच्या एकल खंडपीठाने राज्य सरकारला पक्षकार राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री करीना कपूर खानने 9 जुलै 2021 रोजी तिचे पुस्तक लॉन्च केले. फेब्रुवारीमध्ये दुस-या मुलाला जन्म देणाऱ्या करीनाने (४०) या पुस्तकाचे तिसरे अपत्य म्हणून वर्णन केले होते. पुस्तकाच्या प्रमोशनच्या संदर्भात तिने सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या. करीना खान प्रेग्नन्सी बायबल नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे, अशी याचिका अडव्होकेट क्रिस्टोफर अँथनी यांनी दाखल केली. पुस्तकाच्या शीर्षकात ख्रिश्चनांचे पवित्र पुस्तक ‘बायबल’ जोडल्यामुळे हे प्रकरण तापले आहे. त्यामुळे ख्रिश्चनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, या संदर्भात ओमटी पोलिस स्टेशन आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती आणि करीना आणि प्रकाशकांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. कारवाई न झाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याचिकाकर्त्याचे वकील अनुराग साहू यांनी बाजू मांडली. करीना कपूर खान, अदिती शाह भीमजियानी, अमेझॉन ऑनलाइन शॉपिंग बंगलोर, जुगरनॉट बुक्स नवी दिल्ली यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 295A अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला.

या संदर्भात पोलिसात तक्रार दिल्यानंतरही कारवाई झाली नाही. आता उच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. दरम्यान, करिना कपूरच्या या वादग्रस्त पुस्तकाची आता सिने जगतात जोरदार चर्चा रंगली आहे.

हे देखील वाचा