बॉलिवूडमध्ये प्रत्येकजण चित्रपटामध्ये हिरो बनण्याचे स्वप्न घेऊन येतो, खलनायक बनण्याचा विचार कोणी करत नाही, कारण चित्रपटांमध्ये खलनायकांना मोठ्या तिरस्काराच्या नजरेनी पाहिले जाते. पण चित्रपटांमध्ये खलनायक असल्याशिवाय थ्रिलचा मज्जा येत नाही. पूर्वीच्या काळी खलनायकाकडे खूप तिरस्काराने पाहिले जायचे, पण आता काळ बदलला आहे आणि आता पडद्यावरची खलनायकाची भूमिकाही खूप प्रेक्षकांना आवडतात. असे अनेक चित्रपट आहेत ज्यात नायकापेक्षा खलनायकाला जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही दमदार खलनायकाची ओळख करून देणार आहोत.
विशाल जेठवा – “मर्दानी २” या चित्रपटात किलरच्या भूमिकेत दिसलेल्या विशाल जेठवाचे (Vishal Jethwa) पात्र खूपच भयानक होते. तो मुलींना अतिशय निर्दयीपणे मारायचा आणि यात त्याला फार संतुष्टी मिळाचे. त्याची हत्या करण्याची पद्धतही खूप वेगळी होती. लोक पडद्यावर विशाल जेठवाचा तिरस्कार करत असतील, पण या चित्रपटातील विशालची व्यक्तिरेखा खूप दमदार होती.
आशुतोष राणा – आशुतोष राणा (Ashutosh Rana) प्रत्येक चित्रपटातील दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आपल्या प्रत्येक चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयातून तो व्यक्तिरेखेत जीव टाकतो. आशुतोष राणा यांनी संघर्ष या चित्रपटात खलनायकाची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे साकारली होती. पडद्यावरची त्यांची व्यक्तिरेखा इतकी उग्र होती की लोक थरथरायचे.
रितेश देशमुख –
‘एक व्हिलन’ मधील रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) व्यक्तिरेखा तुम्हाला आठवत असेलच. भलेही त्याची भूमिका तितकी मोठी नव्हती. रितेश देशमुख बहुतेक चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो, परंतु त्याने एक व्हिलनमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो एका सामान्य माणसातून निर्दयी खुनी बनतो. त्याला या भूमिकेसाठी प्रेक्षकाकडून पसंदी मिळाली.
प्रशांत नारायणन –
“मर्डर २” मध्ये प्रशांत नारायणनने (Prashant Narayanan) एका सायको किलरची भूमिका साकारली होती जो मुलींची क्रूरपणे हत्या करतो. या चित्रपटात प्रशांत नारायणन यांनी ट्रान्सजेंडर धीरज पांडेची भूमिका साकारली होती. त्याच्या कपड्यांपासून ते चित्रपटातील अभिनयापर्यंत सगळंच इतकं चांगलं होतं की प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभं राहावं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘म्हणून मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात नाही’, अभिनेता आमिर खानने पहिल्यांदाच केला खुलासा
‘या’ एका व्यक्तीने घोळ घातला नसता तर; मन्नतचा मालक सलमान खान असता, खुद्द भाईजानने केला खुलासा