Thursday, March 28, 2024

माधुरी दीक्षितसोबत मौनी रॉयनेही लावले ‘माए नि माए’ गाण्यावर ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय

टीव्हीवर अनेक रियॅलिटी शो आहेत. यातील अनेक शो प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘डान्स दीवाने ३’ होय. हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शोमध्ये स्पर्धक डान्स तर करतातच. मात्र, खरी मजा तर तेव्हा असते, जेव्हा शोमध्ये आलेले पाहुणे आणि परीक्षक स्वत: मंचावर डान्स करतात. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शोच्या आगामी एपिसोडमध्ये परीक्षक आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या एका प्रसिद्ध गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत अभिनेत्री मौनी रॉयही ठुमके लावणार आहे. माधुरीने आपला हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला जोरदार पसंती मिळत आहे.

खरं तर, अभिनेत्री मौनी रॉय आणि प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये आपल्या नवीन म्युझिक व्हिडिओचे प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावणार आहेत. शोमध्ये माधुरी आणि मौनीची जुगलबंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. याची एक झलक दाखवणारा व्हिडिओ माधुरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत माधुरीने लिहिले आहे की, “माए नि माए मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा, जोगन हो गई तेरी दुलारी… मन जोगी संग लागा.”

माधुरीने या व्हिडिओत जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीत ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. दुसरीकडे मौनी न्यूड रंगाच्या शिमरी साडीत खूपच आकर्षक दिसत आहे. माधुरीसोबतच मौनीनेही तिच्या प्रसिद्ध गाण्यावर प्रत्येक स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. (Dance Deewane 3 Madhuri Dixit And Mouni Roy Dance On Maye Ni Maye Song)

चाहते या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर २ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

‘माए नि माए’ हे गाणे माधुरी दीक्षित आणि सलमान खानच्या ‘हम आपके हैं कौन’ या सुपरहिट चित्रपटातील आहे. या गाण्यावर नेहमी मुली लग्न कार्यक्रमात थिरकताना दिसतात. स्वत: माधुरीनेही आपल्या यूट्यूब चॅनेलवर या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ जेव्हा अपलोड केला होता, तेव्हा तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा माधुरीने आपल्या चाहत्यांना खुश केले आहे.

माधुरीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. त्यामध्ये ‘दिल तो पागल है’, ‘तेजाब’, ‘राजा’, ‘परिंदा’, ‘बेटा’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘साजन’, ‘दिल’, ‘राम लखन’, ‘त्रिदेव’ या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सपना चौधरीला टक्कर द्यायला आली चिमुकली, तिचे ठुमके पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकम झक्कास’

-‘या’ तीन अभिनेत्रींनी केला ‘मनिके मागे हिते’ गाण्यावर जबरदस्त डान्स, शेवट पाहायला विसरू नका

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

हे देखील वाचा