Thursday, April 24, 2025
Home अन्य धनश्री वर्माने केला आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून पती युझवेंद्र चहलची मन जिंकणारी कमेंट

धनश्री वर्माने केला आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून पती युझवेंद्र चहलची मन जिंकणारी कमेंट

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डान्सर धनश्री वर्मा हिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिने भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलसोबत लग्न केले आहे. या दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. लग्नानंतरही धनश्रीने आपली आवड जोपासली असून ती आणखी उत्साहाने डान्स व्हिडिओ बनवते आणि शेअर करते. अशाच प्रकारे तिने आता एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला आहे. हे पाहून पती युझवेंद्र चहलही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही.

धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास आहे का? तुम्हाला असं वाटत नाही का की हे फास्ट फॉरवर्डप्रमाणे आहे आणि सुपरपॅक्ड पावरफुल परफॉर्मन्स आहे? हा व्हिडिओ सादरकरून खूप उत्साहित आहे.”

धनश्रीने एकप्रकारे इशाराच केला आहे की, हा खूप जबरदस्त डान्स परफॉर्मन्स आहे आणि चाहत्यालाही खूप मजा येणार आहे.

परंतु ‘आलू चाट’ गाण्यावर जितका जबरदस्त डान्स धनश्रीने केला आहे, तितकीच मजेशीर कमेंट पती युझवेंद्र चहलनेही केली आहे. युझवेंद्र चहलने या डान्स व्हिडिओवर कमेंट केली की, ‘Wow…’

हा व्हिडिओ धनश्रीने आपल्या यूट्यूबवरही शेअर केला आहे. तिथे या व्हिडिओला १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

धनश्रीचा व्हिडिओ पाहून चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा