‘तेरी आंख्या का यो काजल’, गाण्यावर सपना चौधरीचा जबरदस्त डान्स, ‘देसी क्वीन’च्या व्हिडिओला १८ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

Dancer Sapna Choudhary Dance On Teri Aankhya Ka Yo Kajal Haryanvi Song Video Viral On Internet


प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने आपल्या प्रतिभेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिला देशभरात ओळखले जाते. ती आपल्या डान्समुळे घराघरात पोहोचली आहे. तिचे डान्स व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. असाच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. ‘देसी क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सपनाच्या डान्सवर चाहतेही घायाळ झाले आहेत.

खरं तर सपना चौधरीने ‘तेरी आख्या का यो काजल’ या हरयाणवी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोनोटेक व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. या डान्स व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोबतच यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

सपना चौधरीने आपल्या डान्सने केवळ हरयाणामध्येच नाही, तर संपूर्ण उत्तर भारतात जबरदस्त ओळख निर्माण केली आहे.

तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. सपनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून डान्स परफॉर्मन्ससाठी ऑफर्स मिळत असतात. या व्हिडिओला १८ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सपना डान्सबरोबरच अभिनयातही आपला हात आजमावणार आहे. ती लवकरच रवी किशन आणि मनोज तिवारी यांच्यासोबत एँड टीव्हीवरील क्राईम सीरिज ‘मौका-ए-वारदात’मध्ये झळकणार आहे.

‘मौका-ए-वारदात’ वास्तविक ठिकाणांवर आधारित आहे. ही क्राईम सीरिज वेगवेगळ्या प्रकारच्या कहाणींसोबत क्राईम आणि त्यामागील रहस्य, दृष्टीकोन आणि कार्यप्रणाली उघडकीस आणणार आहे.

सपना चौधरीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने हरयाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीसोबत सुरुवात केली होती. हळू-हळू सपना हरयाणा आणि जवळपासच्या राज्यांमध्ये रागिनीच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागली. यानंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली. विशेष म्हणजे सपनाने ‘बिग बॉस ११’मध्येही भाग घेतला होता. यानंतर तर ती भलतीच प्रसिद्ध झाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: ५ वर्षे रिसर्च करून बनवलेला दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने केला टिझर शेअर

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.