मुंबईमध्ये आपले स्वतःचे घर असावे ही इच्छा सर्वांचीच असते. सामान्य लोकांसोबत कलाकारांना देखील इथे घर असावे असे वाटत असते. मात्र मुंबईत घर घेणे हे अतिशय अवघड आणि काहींसाठी तर असामान्य अशी बाब आहे. अनेक वर्ष काम करूनही या स्वप्ननगरीमध्ये काहींचे घराचे स्वप्न काही पूर्ण होत नाही. मात्र जेव्हा कोणी या शहरात घर घेते तेव्हा मिळणार आनंद नक्कीच अवर्णनीय आहे. यावर्षी मनोरंजन विश्वातील अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता या यादीत अजून एक नाव जोडले गेले आहे.
नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने मुंबईमध्ये घर घेतल्याची माहिती मिळत आहे. एका वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि तिचे वडील सुनील कुमार मल्होत्रा यांनी मुंबईतील अंधेरीच्या पश्चिम परिसरात १४.३ कोटी रुपयांचे अपार्टमेंट विकत घेतले आहे. जुहू वर्सोवा लिंक रोडवरील बेव्ह्यू बिल्डिंगमध्ये असलेल्या या घराचे १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सान्याने सेल डिड केले आहे.
सान्या मल्होत्राने याघरासाठी तब्बल ७१.५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले, असे तिच्या कागदपत्रांवरून दिसत आहे. मुख्य म्हणजे २०२० साली बॉलिवूडचा हँडसम अभिनेता ऋतिक रोशनने देखील याच बिल्डिंगमध्ये घर खरेदी केले आहे. त्याने तब्बल ९७.५० कोटी रुपयांमध्ये ६,५०० स्क्वेयर फूट ओपन-टू-द-स्काय टेरेससह ३८,००० चौरस फूट एक अपार्टमेंट खरेदी केले आहे.
सान्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, तिचा आणि अभिमन्यु दसानी यांचा ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सान्याने आमिर खानच्या दंगल सिनेमातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक ‘बधाई हो’, ‘ल्युडो’, ‘फोटोग्राफ’, ‘पटाखा’, ‘शकुंतला देवी’ आदी अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार चित्रपटांमध्ये दिसली. आगामी काळातही तिचे अनेक सिनेमे प्रदर्शित होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर
-‘कमीत कमी मुलाला तरी सोडा’, म्हणत अबरामच्या मागे लागलेल्या फोटोग्राफर्सवर संतापले चाहते










