Saturday, April 20, 2024

TMKOC: काय सांगता! जेठालालच्या घरात वाजणार सनईचौघडे, पण सामील होणार नाही दयाबेन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या आवडीचा शो आहे. या शोची संपूर्ण स्टार कास्टही प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. शोमधील मुख्य पात्र जेठालाल आणि दयाबेन ही जोडी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारी मानली जाते. आता बातमी आहे की, जेठालाल अर्थातच दिलीप जोशी यांच्या घरी लग्न होणार आहे. पण दयाबेन म्हणजेच दिशा वकानी या लग्नात सहभागी होणार नाही.

जेठालालच्या घरात पार पडणार लग्न सोहळा
खरं तर दिलीप जोशी हे खऱ्या आयुष्यात दोन मुलांचे वडील आहेत. त्यांच्या मुलांबद्दल सांगायचे झाले, तर त्यांना एक मुलगा ऋत्विक जोशी आणि एक मुलगी नियती जोशी आहे. आता त्यांची मुलगी याच महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, नियतीचा होणार नवरा एनआरआय आहे आणि या महिन्याच्या ११ तारखेला दोघेही लग्न करणार आहेत. (daughters wedding will happen at taarak mehtas jethalal house dayaben will not attend)

जोरात सुरू आहे लग्नाची तयारी
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या जवळच्या सूत्राने खुलासा केला आहे की, हे लग्न एखाद्या मोठ्या रॉयल लग्नासारखे होणार आहे. मुंबईतील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक हॉटेल ताज येथे हे लग्न होणार आहे. लग्नात कोणतीही कमतरता राहू नये, याची पुरेपूर काळजी दिलीप जोशी घेत असून, ते स्वतः तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

लग्नाला जाणार नाही दयाबेन!
दिलीप जोशी यांनी या रॉयल वेडिंगमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या संपूर्ण टीमला आमंत्रित केल्याचे, या सूत्राने सांगितले आहे. त्यांनी शोपासून दूर असलेल्या त्यांच्या जुन्या मित्रांना, अर्थातच दिशा वकानीला आमंत्रित केले आहे. मात्र दिशा वकानी या लग्नाला जाणार नाहीये. माध्यमातील वृत्तानुसार, दिशा वकानी आणि दिलीप जोशी अजूनही खूप चांगले मित्र आहेत, पण तिने काही कारणास्तव या लग्नाला येण्यास नकार दिला आहे. दिलीप जोशी यांच्या मुलीला तिने खूप प्रेम आणि आशीर्वाद पाठवले आहेत. दिशा लग्नाआधी किंवा नंतर कुटुंबीयांना भेटेल असेही मानले जात आहे.

अलीकडेच झाले होते रीटा रिपोर्टरचे लग्न
‘तारक मेहता…’ च्या टीममध्ये नुकतेच लग्न एक झाले आहे. शोची अभिनेत्री प्रिया आहुजा आणि दिग्दर्शक राजव मालदा यांनी त्यांच्या लग्नाच्या १०व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा लग्न केले. या लग्नात शोच्या टीमचे अनेक सदस्य मस्ती करताना दिसले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक वर्षांपूर्वीच झाली होती ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ची भविष्यवाणी! व्हायरल होतोय चित्रपटाचा पोस्टर

-कॉमेडियन कृष्णा अभिषेकने केली विकी- कॅटरिनाच्या लग्नाची गुप्त माहिती लीक, सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

-Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’

हे देखील वाचा