सर्व सामान्यांप्रमाणे कलाकारांसाठीही त्यांच्या आयुष्यातील अगदी छोट्या-छोट्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यात अनेक कलाकारांमध्ये प्राणी प्रेम दिसून येते. सहसा कलाकारांचे पाळीव कुत्र्यांवर खूप प्रेम असते. ते त्यांना घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे सांभाळत असतात. त्यांच्यावर प्रेम करतात. अशातच अनु मलिक यांचा भाऊ अबू मालिका यांचा एक भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर अबू मलिक यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातात त्यांच्या घरातील कुत्र्याचा फोटो दिसत आहे. पाच दिवसापूर्वी त्यांच्या कुत्र्याचे निधन झाले आहे. याबाबत ते सांगत आहेत. त्यांनी त्यांच्या कुत्र्याच्या मेडिकल चेकअपसाठी डॉक्टरांकडे नेले होते. त्या दरम्यान त्याचे एक्स-रे देखील करण्यात आले. पण त्यानंतर डॉक्टरांनी डायरेक्ट त्याचा मृत्यू झाला असे घोषित केले. (Death of Abu Malik’s dog, he wrote a FIR in police station)
यावर ते म्हणतात की, “मी पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे, एफआयआर रजिस्टर करण्यासाठी. पाच दिवसापासून आमच्या घरात कोणी नीट जेवले नाही की, कोणी झोपले नाही. मला त्या लोकांना शिक्षा द्यायची आहे. जेणेकरून त्यांना एका जीवाची किंमत कळेल. आज सगळ्या प्राणी प्रेमींना सांगतो की, मला सपोर्ट करा. कारण हा फक्त एक प्राणी नव्हता तर, माझे आयुष्य होता. माझी पत्नी देखील खूप रडत आहे.”
अबू मालिका त्यांचा कुत्रा सहा वर्षांचा होता. २०१५ मध्ये त्याचा जन्म झाला होता. परंतु त्याच्या अशा अनपेक्षित मृत्यूने घरातील सगळ्यांना खूप दुःख झाले आहे. तसेच सोशल मीडियावर देखील अबू मलिक यांच्या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. तसेच अनेकजण त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अबू मलिक हे एक प्रसिद्ध म्युझिक कंपोजर आहेत. त्यांनी अनेक गाण्याचे कंपोजिशन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला
-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ
-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…










