×

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव | पाहा यंदा कोणी-कोणी मारली बाजी

देशभरातील मनोरंजन क्षेत्रातील चित्रपट, मालिका वेब सिरीज यांच्या यशाचे मोजमाप करण्यासाठी अनेक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यामध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारासाठी देशभरातील सर्वोत्तम कलाकृतीची निवड केली जाते. जाणून घेऊ या यंदाच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे विजेते कोण कोण आहेत.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लारा दत्ता, लकी अली, रोहित बॉस रॉय अशा अनेक कलाकारांनी सहभाग नोंदविला होता. यांमध्ये अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पुरस्कार मिळवले आहेत.

लारा दत्ता (Lara Dutta)
अभिनेत्री लारा दत्ताला ‘बेल बॉटम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आशा पारेख (Asha Parekh)
हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

एरिका फर्नांडिस (Erica Fernandez)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसला दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मधील सोनाक्षीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

अनुपमा
प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम ‘अनुपमा’ ला या वर्षीची सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्यासोबतच टीव्ही कलाकार शाहीर शेखला (Shahir Sheikh) ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

रवीना टंडन (Raveena Tandon)
अभिनेत्री रवीना टंडनला ‘अरण्यक’ वेबसिरीजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सोबतच मनोज वाजपेयी यांना (Manoj Bajpayee) ‘द फॅमिली मॅन २’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

पुष्पा
यंदा सुपरहिट ठरलेल्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाने इथेही बाजी मारली आहे. पुष्पा चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला (Sidharth Malhotra) ‘शेरशाह’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा – 

Latest Post