Thursday, September 28, 2023

72 वर्षीय शबानासह दिलेल्या किसिंग सीनवर धर्मेंद्रनी तोडले मौन; म्हणाले, ‘रोमान्सला वयाची..’

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला लोकांनी चांगली पसंती दर्शविली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. त्यामध्ये शबाना आझमी यांनी किसिंग सीन दिला आहे. त्यानंतर जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र किसिंग सीनबद्दल खुलासा केला आहे.

87 वर्षीय धर्मेंद्र (Dharmendra)यांना 72 वर्षीय शबाना आझमीसोबत किसिंग सीन करताना पाहून काही प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांभोवती फिरतो. जे प्रेमात पडतात परंतु सांस्कृतिक फरकांमुळे त्यांची कुटुंबे एकमेकांशी भिडताना दिसते. या चित्रपटात जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. धर्मेंद्र-शबाना आझमी यांच्या रोमँटिक सीनवर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यावर अभिनेते धर्मेंद्र म्हणाले की, “शबानाच्या किसिंग सीनमुळे प्रेक्षक हैराण झाले आहेत ही गोष्ट मी ऐकलं आहे. पण काही लोक त्यांचे तोंडभरून कौतुक करत आहेत. प्रेक्षकांना असे काही पाहायला मिळेल याची अपेक्षा नव्हती. गेल्या वेळी मी ‘लाइफ इन अ मेट्रो’मध्ये नफिसा अलीबरोबरही किसिंग सीन शूट केला आहे. त्यावेळी लोकांनी त्याचे खूप कौतुक केले होते.”

ते पुढे बोलताना म्हणाले की, “माझा विश्वास आहे की रोमान्स करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. वय हा एक फक्त आकडा आहे. हा सीन देताना मला आणि शबानालाही अजिबात लाज वाटला नाही, अत्यंत सुंदर पद्धतीने हा सीन आम्ही केला आहे.” ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून करण जोहरने अनेक वर्षांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. 28 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.5 कोटींची कमाई केली होती. (Dharmendra broke his silence on the kissing scene with 72-year-old Shabana)

अधिक वाचा- 
अय्यो! एवढ्या महागड्या गाड्यांसोबत सोनू निगमाला आहे ‘या’ गोष्टींचा छंद
‘प्रेक्षक 300 रुपयात चित्रपट का पाहतील?’, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केले खळबळजक वक्तव्य

हे देखील वाचा