Friday, December 1, 2023

सुंबुल ताैकीरचे वडिल दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात; अभिनेत्री म्हणाली, “आम्ही आमच्या नवीन आईचे…’

टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीरचे वडिलांसाेबत खूप घट्ट नाते आहे. काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस 16‘मध्ये दिसलेल्या ताैकीर खानने इमलीचे काैतुक केले आणि सांगितले की, कशाप्रकारे त्यांनी आपल्या दोन मुलींना वाढवले. अशात आता, सुंबूल आणि तिची बहीण सानिया यांनी त्यांच्या वडिलांना पुन्हा लग्न करण्यास मनवले आहे. तौकीर खान हे पुढच्या आठवड्यात निलोफरशी लग्न करणार आहे आणि त्यांनाही एक मुलगी आहे.

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत तिच्या वडिलांच्या लग्नाबद्दल बोलताना सुंबुल म्हणाली, “आम्ही आमच्या नवीन आईचे आमच्या कुटुंबात स्वागत करण्यासाठी खूप आनंदी आणि उत्साहित आहोत. आमच्या वडिलांच्या पत्नीसोबत, एक नवीन बहीण देखील आमच्या कुटुंबात सामील होणार आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे.”

आमचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून आमची सर्वात मोठी प्रेरणा आणि आधार आहेत. अशात सानिया आणि मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहोत. आमचे बडे बाबा इक्बाल हुसैन खान यांनी ही या लग्नात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे.

सुंबुल ताैकीर शेवटची ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसली होती. ‘इमली’चा सहकलाकार आणि मित्र फहमन खानसोबतच्या रुमर्ड रिलेशनशिपमुळे ती चर्चेत हाेती. अशात जेव्हा पॅपराझींने तिला फहमनसोबत सुरू असलेल्या भांडणाबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, “असे काहीही नाही, आमच्याच सर्व ठिक आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumbul Touqeer (@sumbul_touqeer)

सुंबूल लवकरच ‘सिंगल’मध्ये दिसणार आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “आगामी गाणे माझी बहीण, बाबा आणि माझ्यासाठी खूप खास आहे आणि आम्ही त्यावर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सनाया आणि मी ते गायले आहे. अशात अभिनेत्रीच्या या गाण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत.(tv sumbul touqeer father touqeer khan is getting married for the second time know who is the bigg boss 16 fame actress new mother )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्पवयीन मुलीवर बला’त्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट
दीपिका कक्करने जुळ्या मुलांना दिला जन्म? पती शोएब इब्राहिमने केला खुलासा

हे देखील वाचा