×

चुकूनही लहान मुलांसोबत पाहू नका ‘या’ वेबसिरीज, शरमेने डोळे करावे लागतील बंद

ओटीटी प्लॅटफॉर्मची दुनिया चित्रपटगृहाच्या जगापेक्षा खूप वेगळी आहे. चित्रपटगृहांवरील चित्रपटांना त्यांच्या प्रदर्शनापूर्वी अनेक पॅरामीटर्समधून जावे लागते, परंतु ओटीटीवर हे क्वचितच दिसून येते. तुम्हाला ओटीटीवर सर्व प्रकारचे चित्रपट आणि वेबसिरीज मिळतील. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्हाला कोणत्याही स्टाईलचे चित्रपट किंवा सीरिज पाहायला आवडतात. अशा कोणत्या सीरिज किंवा चित्रपट आहेत, ज्या तुम्ही मुलांसोबत पाहायला येणार नाहीत. या पाहताना एकतर मुलं तुमच्यापासून उठतील, नाहीतर तुम्हाला लाजेने डोळे बंद करावे लागतील.

सेक्स लाइफ
या सीरिजमध्ये बिली नावाची मुलगी दाखवण्यात आली आहे जी तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. परंतु तिच्या जुन्या आयुष्यातून बाहेर पडू शकत नाही आणि तिच्या प्रियकराला वारंवार भेटते. ती एका वेगळ्या काल्पनिक जगात राहते.

फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे
‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ हा नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक चर्चेत असलेला आणि बोल्ड चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्षे झाली असली तरीही, तो ओटीटीच्या सर्वात बोल्ड चित्रपटांमध्ये गणला जातो.

३६५ डेज
मिशेल मॉरोनचा चित्रपट ‘३६५ डेज’ हा नेटफ्लिक्सवरील सर्वात बोल्ड चित्रपटांपैकी एक आहे. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची बरीच चर्चा झाली.

सेक्स एजुकेशन
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘सेक्स एजुकेशन’चा कंटेंट खूपच बोल्ड आहे. त्याचे नाव नक्कीच एजुकेशनशी संबंधित आहे. पण तरीही तुम्ही ते मुलांसोबत अजिबात पाहू नये.

मिल्फ
‘मिल्फ’ तीन स्त्रियांची कथा आहे ज्या घटस्फोटित आहेत आणि घटस्फोटानंतर वेगवेगळ्या लोकांना भेटतात आणि शारीरिक संबंध ठेवतात. या चित्रपटाचा आशय खूपच बोल्ड आहे. त्यामुळे मुलांसोबत बसून चुकूनही तो पाहू नये.

ऍडीक्टेड
या सीरिजमध्ये एका विवाहित स्त्रीचे चित्रण केले आहे. जिचे पती आणि मुलांवर अतोनात प्रेम आहे, परंतु एक वेगळे कल्पनारम्य जग तिला बाहेरील जगाशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडते.

हेही वाचा :

Latest Post