Thursday, April 23, 2026
Home बॉलीवूड ‘भूत पोलिस’च्या प्रमोशन दरम्यान फोटोग्राफर म्हणाला, ‘फेयर ऍंड लव्हली इथे…’, यामी गौतमनेही दिले सडेतोड उत्तर

‘भूत पोलिस’च्या प्रमोशन दरम्यान फोटोग्राफर म्हणाला, ‘फेयर ऍंड लव्हली इथे…’, यामी गौतमनेही दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ‘यामी गौतम’ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सध्या तिच्या आगामी ‘भूत पोलीस’ चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनत आहे. यामी या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे ती एका फोटोग्राफरला चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

‘फेयर अँड लव्हली इथे…’
अलीकडेच यामी गौतम मुंबईत ‘भूत पोलिस’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान फोटोशूट करत होती. या दरम्यान, एक फोटोग्राफर म्हणाला की, “फेयर अँड लव्हली इथे … समोर.” यामीला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. ती म्हणाला की, “पुन्हा एकदा बोलला ना…” यामी नंतर म्हणाली, “आदराने बोला, अशी नावं नाही.” शिवाय यामी गौतम अशाच एका ब्रँडसाठी काम करतेय.

‘भूत पोलीस’ १७ सप्टेंबरला होणार प्रदर्शित
‘भूत पोलिस’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १७ सप्टेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर चित्रपटाची गाणीही हळूहळू प्रदर्शित केली जात आहेत.

कॉमेडी करून आनंदी आहे अर्जुन
‘भूत पोलीस’ हा चित्रपट गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशमध्ये शूट करण्यात आला आहे. शूटींग दरम्यान करीना धर्मशाळेत गेली होती. त्याचवेळी मलायकाही अर्जुन कपूरसोबत पोहोचली होती. त्यावेळी सैफ-करीना आणि मलायका-अर्जुन यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

‘भूत पोलिस’ विषयी बोलताना अर्जुनने स्पॉटबॉयला सांगितले की, “मी या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साहित आहे. मला खरोखर आनंद होत आहे की, मला अशा वेळी प्रयोग करण्याची संधी मिळत आहे. मला वाटते की, लोकांना हसवणे खूप महत्वाचे आहे. ’भूत पोलीस’ हा माझा आगामी चित्रपट आहे याचा मला खूप आनंद आहे.” त्याचवेळी चाहते देखील या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंसी बिरजू’ भोजपुरी चित्रपटाचं गाणं झालं प्रदर्शित, अल्पावधितच ‘इतके’ व्ह्यूज मिळवून केला राडा!

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल
-Bigg Boss OTT: शमिता शेट्टीला पसंत करू लागलीये राकेश बापटची फॅमिली; बहिणीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा