अभिनेत्री अश्विनी भावे यांनी सांगितल्या राजीव कपूर यांच्या सोबतच्या आठवणी

Famous Actress Ashvini Bhave Share Memories With Late Rajiv Kapoor


ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ, ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने नुकतचं निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अभिनेते राजीव कपूर यांच्या सोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. अश्विनी भावे यांनी आर. के स्टुडिओच्या बॅनर खाली १९९१ साली ‘हीना’ हा सिनेमा केला होता. हीना सिनेमातील भूमिकेमुळे त्या हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आल्या. त्याच हीना सिनेमाचे निर्माते ‘राजीव कपूर’ हे होते.

राजीव कपूर यांच्या सोबतच्या हीना सिनेमातील आणि आर. के. स्टुडिओतील आठवणी शेअर करताना त्या म्हणाल्या, “खरंतर ऋषी कपूर यांच्यासोबत ‘हीना’ सिनेमात काम मिळणं हे माझ्यासाठी स्वप्नवत होतं. तसंच राजीव कपूर या सिनेमाचे निर्माते होते. ते सेटवर सर्वांची योग्य ती काळजी घ्यायचे. हीना सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी नेहमीच मला प्रेम आणि आदराने वागवले. तसेच आर. के. स्टुडिओत माझे विशेष स्वागत केले. त्यांनी वेळोवेळी मला सेटवर मार्गदर्शनही केले होते. यासाठी मी त्यांची ऋणी राहीन.”

पुढे त्या म्हणाल्या, “राजीव कपूर यांच्या निधनाच्या बातमीनं मला खूप दु:ख होतंय. तो उत्तम कलाकार, एक चांगला दिग्दर्शक आणि यापलीकडे तो सहृदयी माणूस होता. आपण पाहतोय गेल्या काही काळात आर. के. कुटुंबावरती आघातांवर आघात होत आहेत. या दु:खातून सावरण्याची ताकद देव त्यांना देवो आणि राजीव कपूर यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो अशी मी प्रार्थना करते.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते

-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ


Leave A Reply

Your email address will not be published.