Friday, June 14, 2024

“तो माझे लपून फोटो काढत होता अन् पोलिसांनी…”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ भन्नाट किस्सा

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी रुपल नंदने डेंटिस्टचा अभ्यास केला आहे. मात्र अभिनयाकडे तीच कल असल्यामुळे ती या क्षेत्रात आली. मनोरंजन क्षेत्राविषयी असलेल्या आवडीमुळेच डॉक्टर असूनही तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. रूपलने श्रावणक्वीन या सौंदर्य स्पर्धेतून रूपेरी दुनियेतील एन्ट्री केली आहे. रूपलच्या नावावर बेस्ट पर्सनॅलिटी या विभागातील बक्षीस कोरले गेले होते. त्यानंतर तिच्यासाठी अभिनय क्षेत्राची दारे खुली झाली होती. तिने ‘गोठ’ या मालिकेतून राधा ही भूमिका साकारात छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.

रूपलने (Rupal Nand) साकारलेली राधाची भूमिका प्रचंड गाजली. तेव्हापासून तिला खूप लोकप्रियता मिळाली. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले. अन्यायाविरोधात आवाज उठवणारी एक धाडसी मुलगी अशी तिची भूमिका होती. त्यानंतर ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेतील अनन्याची भूमिका तिने साकारली. ‘मुंबई पुणे मुंबई’ या सिनेमाच्या तिसऱ्या भागामध्ये रूपलने साकारलेली मुक्ता बर्वेच्या बहिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांना भरभरून साथ दिली. मोजक्या भूमिका करून रूपलने मनोरंजनविश्वात तिचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rupal Nand (@rupalnand)

रुपल म्हणाली की, “मी एकदा रस्त्याने शॉपिंग करत जात होते. मी माझ्या खरेदीमध्ये गर्क असतांना पोलिसांनी माझ्यासमोर एका व्यक्तीला मानेला धरुन फरपटत आणले. मला ते दृश्य पाहून पोलिस असं का करत आहेत हे नेमकं मला तेव्हा कळतच नव्हत. त्यावेळी पोलिसांनी मला सांगितलं की, हा व्यक्ती तुमचे चोरून फोटो काढत आहे. ते ऐकून मला धक्काच बसला. मात्र तेव्हा पोलिसांनी मला अनेक गोष्टी समजून सांगितल्या. तेव्हा जाणवले की पोलिसांना घाबरायची गरज नाही ते आपल्या मदतीसाठीच असतात.”

रूपल सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहत्यांसोबतचा एक भन्नाट किस्सा रूपलने शेअर केला आहे. त्यामुळे रूपल सध्या चर्चेत आली आहे. (Famous Marathmola actress Rupal Nand told this amazing story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
विकी काैशल अन् सारा दिसले रोमँटिक अंदाजात, फाेटाे व्हायरल
इश्क का रंग सफेद! उर्वशी राैतेलाचा ‘व्हाईट फेदर गाऊन’मध्ये ग्लॅमरस अंदाज, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा