मल्लिकाला चाहत्याने घातली लग्नाची मागणी; हॉट फोटो पाहून म्हणाला, ‘प्लीझ माझ्याशी लग्न कर…’


बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींचा भरणा आहे. याच अभिनेत्रींमध्ये ‘मर्डर’ फेम अभिनेत्री मल्लिका शेरावतचाही समावेश होतो. मल्लिकाने आपल्या बोल्डनेसने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. ती जेवढी चित्रपटात बोल्ड आहे, कदाचित त्यापेक्षाही अधिक बोल्ड ती खऱ्या आयुष्यातही आहे. तिचे चाहते तिच्या बोल्डनेसचे दीवाने आहेत. तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टसाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्रीही त्यांचे मन न दुखावता आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मल्लिकाने बोल्ड फोटो केले शेअर
मल्लिकाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तीन हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने मेहरून रंगाच्या ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा ड्रेस डीप नेक आहे. यासोबतच तिने वेगवेगळे पोझही दिले आहेत. या फोटोंमध्ये ती गंभीर दिसत आहे. (Fan Proposed To Mallika Sherawat Seeing Hot Photos Said Please Marry Me)

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत १० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर शेकडो कमेंट्सही मिळाल्या आहेत.

लग्नाची घातली मागणी
मल्लिकाच्या या पोस्टवर तिला लग्नाची मागणीही घालण्यात आली आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, “माझं तुझ्यावर प्रेम आहे. प्लीझ माझ्याशी लग्न करशील का?” विशेष म्हणजे मल्लिकाने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे की, तिच्यासाठी हे काही नवीन नाही. तिला नेहमी अशाप्रकारच्या मागण्या घातल्या जातात.

कास्टिंग काऊचवर केले हे वक्तव्य
नुकतेच मल्लिकाने इंडस्ट्रीतील काळ्या सत्यावरही खुलासे केले. तिने कास्टिंग काऊचवरही मोकळेपणाने चर्चा केली. माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, “मी गोष्टींचा सामना केला नाही. स्टारडम माझ्यासाठी खूप सोपे नव्हते. मी भाग्यवान होते आणि माझ्यासाठी गोष्टी आपोआप होत गेल्या. मी मुंबईत आले. माझी मर्डर चित्रपटाची इच्छा होती. मला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही पडली.”

पुढे बोलताना ती म्हणाली की, “मर्डर चित्रपट थोडा बोल्ड होता, परंतु काही चित्रपटांनंतर माझी एक प्रतिमा बनली. अनेक पुरुष कलाकार माझा फायदा उचलण्याचा विचार करू लागले. ते मला म्हणायचे की, जर तू ऑनस्क्रीन बोल्ड होऊ शकतेस, तर ऑफस्क्रीन का नाही.”

मल्लिकाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘वेलकम’, ‘हिस’, ‘डबल धमाल’, ‘गुरू’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘भूमिकेसाठी आपण जे करतो तेच भूमिका आपल्यासाठी करते’, म्हणणाऱ्या मोहित रैनाने सिनेमासाठी शिकली परदेशी भाषा

-आता आख्खं जग फिरूनच घरी येणार! अजित कुमार यांनी सुरू केली जगभ्रमंती

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

 


Leave A Reply

Your email address will not be published.