×

रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा नवीन लूक पाहून फॅन्सला बसला जोरदार धक्का

हॉलिवूड स्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियरचे संपूर्ण जगात कोट्यवधी चाहते आहेत. त्याने त्याच्या अभिनयाने आणि दमदार ऍक्शनने अमाप लोकप्रियता मिळवली. रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटांमध्ये आयर्न मॅन अर्थात टोनी स्टार्कची भूमिका साकारली आणि तो संपूर्ण जगात ओळखला जावू लागला. मागचा सिनेमा ‘अवेंजर्स: एंडगेम’मध्ये त्याच्या भूमिकेचा मृत्यू झाला असल्याचे दाखवले. आपल्या आवडत्या आयर्न मॅनच्या मृत्यूमुळे त्याचे संपूर्ण फॅन्स खूपच भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र आता सुद्धा त्याचे फॅन्स त्याला घेऊन चिंतेत आले आहे. या चिंतेचे कारण म्हणजे रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने शेअर केलेले त्याचे लेटेस्ट फोटो.

View this post on Instagram

A post shared by Robert Downey Jr. Official (@robertdowneyjr)

रॉबर्ट डाऊनी ज्युनियर सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय आहे. तो या माध्यमाच्या मार्फत सतत त्याच्या फॅन्सच्या संपर्कात असतो. नुकताच त्याने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा लूक पाहून फॅन्स काहीसे घाबरले असून कमेंट्स करत ते सतत त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. या व्हिडिओमध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियर अजिबात ओळखूच येत नाही. टीशर्टमध्ये दिसणारा ५७ वर्षीय रॉबर्ट डाऊनी ज्युनियर या व्हिडिओमध्ये अतिशय बारीक आणि अशक्त दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Robert Downey Jr. Official (@robertdowneyjr)

रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने जसा हा व्हिडिओ शेअर केला तसे त्याच्या फॅन्स कमेंट्स करत त्याची चौकशी करताना दिसत आहे. एका फॅनने लिहिले, “तुला म्हातारा होणे बघणे खूपच दुःखदायक आहे.” अजून एकाने लिहिले, “हे देवा ओळखूच येत नाही की हा रॉबर्ट डाऊनी ज्युनियर आहे.”, एकाने लिहिले, “तुझी तब्येत नक्की ठीक आहे ना?” तत्पूर्वी रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने त्याच्या करिअरची सुरुवात ८० च्या दशकात देखील होती. त्यानंतर तो काही काळातच हॉलिवूड चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये सुपरहिट झाला. रॉबर्ट जेव्हा ड्रग्स सेवनासाठी जेलमध्ये गेला तेव्हा त्याला अमाप लाईमलाइट मिळाले. आता जरी तो आयर्न मॅन भूमिकेत दिसणार नसला तरी तो चित्रपटांमध्ये काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post