‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’सोबतच्या लिंक-अपवर फातिमाने सोडले होते मौन; म्हणाली होती, ‘असंख्य लोकांच्या गर्दीत…’


बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव शनिवारी (३ जून) विभक्त झाले आहेत. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरीत्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली. आमिर आणि किरण १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते. दोघांनीही आझाद नावाचा एक मुलगा आहे.

दरम्यान आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमानंतर अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत आमिरचे नाव जोडले गेले होते. फातिमा आणि आमिर यांच्यात काहीतरी शिजतेय अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. मात्र, फातिमाने ‘कुछ तो लोग कहेंगे’ असे म्हणत आमिरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला होता. आमिर आणि किरण यांच्या घटस्फोटाचे खरे कारण कोणालाच माहित नसले, तरीही सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा शेखला या घटस्फोटासाठी जबाबदार धरले आहे. या पती- पत्नीमध्ये फातिमा ‘वो’ बनून आली आणि यांचे नाते तुटले असे आरोप आता फातिमावर केले जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, फातिमा आणि आमिर खान ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमाच्या वेळी जवळ आले आणि या दोघांमध्ये काही आहे, अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. या बातम्यांनी किरण राव देखील वैतागली होती. या अफवांवर फातिमाने एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले होते.

फातिमा म्हणाली होती की, “आधी मला या सर्व गोष्टी खूप त्रासदायक वाटायच्या. या गोष्टींचा माझ्यावर मोठा आणि खोलवर परिणाम देखील व्हायचा. मी कधीही एवढ्या मोठ्या पातळीवर अशा कोणत्याही गोष्टींचा सामना केला नव्हता. असंख्य अनोळखी लोकांच्या झुंडमध्ये मी कधीच नव्हते. माझ्याबद्दल खूप काही लिहिले गेले. मात्र, ज्यांनी लिहिले त्यांना हे देखील नाही माहित की, त्यात किती खरेपणा आहे. हे सर्व वाचणाऱ्या लोकांना मी किती वाईट आहे हेच वाटत असेल. मात्र, एवढ्या गोष्टी ऐकून मी त्यावर कानाडोळा करायला शिकले आहे. पण हे देखील तितकेच खरे आहे की, मी यासर्व गोष्टींनी प्रभावित झाले होते.”

तत्पूर्वी किरण रावशी आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. या आधी १९८६ मध्ये आमिर आणि रीना दत्ता विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयरा आणि जुनेद ही दोन मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.