×

भारीच ना! ट्विंकल खन्नाच्या ‘या’ शॉर्ट स्टोरीवर बनतोय चित्रपट

बॉलिवूडमधील अतिशय स्पष्टवक्ता अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्ना (Twinkal Khanna) ओळखली जाते. ती प्रत्येक गोष्टीत अतिशय परखडपणे मते मांडते आणि आपली निष्पक्ष भूमिका सर्वांसमोर ठेवते. ती प्रत्येक राजनैतिक आणि सामाजिक मुद्द्यांवर स्वतःचा पक्ष सर्वांसमोर ठेवण्यासाठी ओळखली जाते. कोणाची आलोचना करताना देखील ती मागे पुढे बघत नाही. अक्षय कुमारची देखील ती अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आलोचना करताना दिसते. तिला लिहायलाही खूप आवडतं. अशातच तिच्या पुस्तकाशी संबंधित एक चांगली बातमी समोर आली आहे.

ट्विंकल खन्नाच्या (Twinkle Khanna) ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ बेस्ट सेलिंग पुस्तकातील ‘सलाम नोनी आपा’ या लघुकथेवर चित्रपट बनणार आहे. अप्लॉज एंटरटेनमेंटने (Applause Entertainment) चित्रपटासाठी ट्विंकल खन्नाच्या मिसेज फनीबोन्स मूवीज (Mrs Funnybones Movies) आणि एलिप्सिस एंटरटेनमेंटसोबत (Ellipsis Entertainment) हातमिळवणी केली आहे. (film based on twinkle khanna short story salaam noni appa from her best selling book)

सोनल डबरालचे दिग्दर्शनात पदार्पण
हा एका स्टिरियोटाइपला तोडणारा उत्कृष्ट कॉमिक रोमान्स चित्रपट आहे, जो जाहिरात जगतातील सोनल डबराल (Sonal Dabral) बनवत आहे. या चित्रपटातून सोनल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

‘माझी आजी आणि तिची बहीण यांच्यातील नातेसंबंधाची कहाणी’
ट्विंकल खन्ना म्हणाली, “सलाम नोनी आप्पा ही कथा माझ्या दुसऱ्या पुस्तकातील आहे, जी माझी आजी आणि तिच्या बहिणीच्या नात्यावर आधारित आहे. याला आधी एका सुंदर नाटकात रूपांतरित केले होते. अप्लॉज आणि एलीप्सिससोबत हात मिळवणे आणि याचे चित्रपटात रूपांतर करणे, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि अनेक माध्यमांपर्यंत पोहोचवणे हा एक अद्भुत क्षण आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post